इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत – पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे उर्वरीत सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज त्यांनी केली. आयपीएलचे एकुण १६ सामने शिल्लक असतांना हा निर्णय घेण्यात आल्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. स्थगित केलेले हे सामने पुन्हा केव्हा खेळवण्यात येईल याची मात्र माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
कालच पाकिस्तानने रात्री भारतावर ड्रोनने हल्ले केले, ते भारतीय सैन्याने निष्फळ ठरवले. पण, या हल्ल्यामुळे धर्मशाळा येथील सामना रद्द करावा लागला. २५ मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. एकुण ७४ सामने खेळवले जाणार होते. त्यातील १६ सामने शिल्लक असतांना हा निर्णय घेण्यात आला. २५ मे रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्स येथे अंतिम सामना होणार होता. पण, आता तोही लांबणीवर पडला आहे. आय़पीएलमध्ये विदेशी खेळाडू मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आयपीएल प्रमाणे या तणावाचा पाकच्या क्रिकेट लिगवरही परिणाम झाला आहे. रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाल्यामुळे येथेही सामने रद्द करण्यात आले आहे. पण, उर्वरीत सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.