मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – क्रिकेट हा भारतीय नागरिकांचा आवडता खेळ आहे. क्रिकेट खेळाडू देखील वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करीत असतात. सचिन तेंडुलकर असो की विराट कोहली. तसेच सौरभ गांगुली असो की महेंद्रसिंग धोनी यांनी आपआपल्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता त्यात आणखी हार्दिक पंड्या याची भर पडली आहे.
हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 षटकार ठोकणारा भारतीय ठरला आहे. या संघाची फलंदाजी पाहून संघाची धावसंख्या 150 च्या पुढे जाईल, असे वाटत नव्हते, पण हार्दिक पंड्याने अत्यंत समंजस फलंदाजी करत संघाची धावसंख्या 150 म्हणजेच 162 च्या पुढे नेण्यात मोठा वाटा उचलला. हार्दिक पांड्याने या सामन्यात 42 चेंडूंचा सामना केला आणि 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. एका षटकाराच्या मदतीने त्याने या लीगमध्ये शानदार विक्रम केला.
विशेष म्हणजे IPL इतिहासातील सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना 100 षटकार मारणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. या लीगमध्ये त्याने 1046व्या चेंडूवर 100 वा षटकार ठोकला. त्याच वेळी, सर्वात कमी चेंडूंचा सामना करताना 100 षटकार मारण्याच्या बाबतीत तो या लीगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वात कमी चेंडूंचा सामना करत 100 षटकार ठोकण्याच्या बाबतीत आंद्रे रसेल आयपीएलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर ख्रिस गेल या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिक आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर किरॉन पोलार्ड आणि मॅक्सवेल चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
IPL मध्ये 100 षटकार मारण्यासाठी सर्वात कमी चेंडूंचा सामना करणारे पहिले 5 फलंदाज: 657 – आंद्रे रसेल, 943 – ख्रिस गेल, 1046 – हार्दिक पंड्या, 1094 – किरॉन पोलार्ड, 1118 – ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे.