मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विचार करा की एखाद्या संघाचा माजी खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसला आहे. अर्धी स्पर्धा आटोपलेली आहे. तो कॉमेंट्रीत चौकार षटकार मारतोय. आणि त्याचवेळी त्याचा जुना संघ त्याला बोलावतो आणि थेट मैदानात उतरवतो. हे काल्पनिक वाटत असले तरीही आयपीएलमध्ये शक्य आहे.
इंडियन प्रिमीयर लिग या स्पर्धेत काहीही शक्य आहे, याची आपण दररोज प्रचिती घेतो. अशक्य वाटणाऱ्या घटना या स्पर्धेत घडत असतात. कधी सामना जिंकण्यावरून तर कधी खेळाडूंच्या परफॉर्मन्सवरून. यावर्षी आयपीएलच्या डिजीटल प्रसारणाचे हक्क जिओ सिनेमाकडे आहेत. जिओ सिनेमावरून सर्वच भारतीय भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन ऐकायला मिळते. भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव आयपीएलमध्ये मराठीतून समालोचन करीत होता. पण रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला संघात परत बोलावले आहे.
डेव्हिड विली जखमी झाल्यामुळे आरसीबीने केदार जाधवला परत संघात घेण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड विलीने तीन सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. पण आता तो पुढचे सामने खेळू शकणार की नाही याबद्दल व्यवस्थापनाला शंका होती. त्यामुळे त्यांनी केदारला थेट कॉमेंट्री बॉक्समधून मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर केदारसाठी हा अनपेक्षित धक्का आहे. पण यापूर्वी हीच घटना दिनेश कार्तिकसोबत घडली होती. आरसीबीनेच दिनेश कार्तिकला कॉमेंट्री बॉक्समधून बाहेर काढून संघात घेतले होते. आणि त्यानंतर त्याने दमदार कामगिरी करत संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरवला. आता केदार जाधवही हीच किमया साधणार का, याची उत्सुकता लागलेली आहे.
? ANNOUNCEMENT ?
Indian all-rounder Kedar Jadhav replaces injured David Willey for the remainder of #IPL2023.
Welcome back to #ನಮ್ಮRCB, Kedar Jadhav! ?#PlayBold @JadhavKedar pic.twitter.com/RkhI9Tvpi1
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 1, 2023
कुणीच विकत घेतले नव्हते
यावर्षीच्या लिलावात केदार जाधवला कोणत्याच संघाने विकत घेतले नव्हते. विशेष म्हणजे ज्या संघाकडून तो आतापर्यंत १७ आयपीएल खेळला त्या आरसीबीनेही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो अनसोल्ड राहिला होता. त्यामुळे त्याची एन्ट्री आश्चर्यकारक मानली जात आहे. केदारने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करीत ९३ सामन्यांमध्ये १ हजार १९६ धावा काढल्या आहेत.
आरसीबीचा संघर्ष
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघात कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांचा अपवाद वगळता अद्याप कुणालाही फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मधली फळी तर सपशेल अपयशी ठरली आहे. आतापर्यंत आठपैकी चार सामने गमावले असून चार सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. अश्यावेळी केदार जाधवची एन्ट्री फायद्याची ठरते का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
? NEWS ?@RCBTweets name Kedar Jadhav as replacement for David Willey.
Details ? #TATAIPLhttps://t.co/HBEgEB2X11
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2023
IPL 2023 RCB Commentary Kedar Jadhav Team Entry