मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात सामना चांगलाच रंगला होता, त्याचबरोबर या सामन्यामध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले. पंजाबने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवन आणि कागिसो रबाडा यांचे पुनरागमन झाले आहे. यात लखनौ संघ विजयी झाला, मात्र पंजाब टिममधील मर्द मराठा अथर्व तायडे याने जिद्दीने लढत दिली.
दोन्ही संघांमधील पहिल्या टप्प्यातील सामन्यात पंजाबने लखनौचा त्यांच्या घरच्या मैदानावर दोन गडी राखून पराभव केला. सिकंदर रझाने ५७ धावांची खेळी केली होती आणि एक विकेटही घेतली होती. राहुल आपल्या जुन्या संघाकडून या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण दोन सामने झाले आहेत. यापैकी एक सामना पंजाबने तर एक लखनौने जिंकला आहे.
मुळचा महाराष्ट्राच्या अथर्व तायडेने लखनौविरुद्धच्या सामन्यात तुफानी फटकेबाजी केली आणि तो पंजासाठी हिरो ठरला. शिखर धवन संघात नसताना अथर्वला संधी देण्यात आली होती. पंजाबच्या संघाला त्याची गुणवत्तापूर्ण खेळी आवडली त्यामुळे त्याला सातत्याने संधी दिली. लखनौच्या सामन्यात अथर्वने या संधीचे सोने केले. पंजाबचे खेळाडू अपयशी ठरत असताना अथर्वने एकाकी किल्ला लढवला आणि त्याने ३६ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
अथर्व हा मूळचा अकोल्याचा असून आधी विदर्भाच्या संघाकडून तो खेळला. विदर्भाच्या संघाने आतापर्यंत त्याने दमदार कामगिरी केली. तसेचबीसीसीआयच्या स्पर्धा त्याने गाजवल्या आणि त्यावेळीच पंजाबच्या संघाची नजर त्याच्यावर पडली. अथर्व हा डावखुरा सलामीवीर आहे. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने २० षटकांमध्ये २५७ धावा केल्यानंतर पंजाबला २०१ धावांत रोखत सामना ५६ धावांनी जिंकला.
या सामन्यामध्ये लखनौने दिलेल्या या आव्हानाचा सामना करताना पंजाबकडून एकच फलंदाज अथर्व तायडे हा जिद्दीने या आव्हानाला भिडला होता. कारण लखनौने दिलेले २५८ धावांचे आव्हान पंजाबसाठी तसे अशक्य होते. त्यातच कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग हे झटपट बाद झाल्याने पंजाबचा डाव खूप अडचणीत आला. मात्र याचवेळी मराठमोळ्या अथर्व तायडेने लखनौच्या गोलंदाजांवर तुफानी प्रतिहल्ला करत सामन्यात रंगत आणली.
यावर्षी लिवावामध्ये पंजाब किंग्सच्या संघाने त्याला केवळ २० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले होते. आयपीएलमधील त्याचा हा दुसरा हंगाम आहे. केवळ आयपीएलच नाही तर याआधी झालेल्या देशातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतही अथर्व तायडेने एक शतक व तीन अर्धशतकांसह ४९९ धावा काढल्या होत्या.
यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवनला दुखापत झाल्याने अथर्व तायडेला संधी मिळाली असून अथर्व अशा प्रकारचे योगदान देत राहिल्यास भविष्यात पंजाब संघासाठी एक प्रमुख खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ शकतो.
A well made FIFTY by Atharva Taide off 26 deliveries.
Live – https://t.co/6If1I4omN0 #TATAIPL #PBKSvLSG #IPL2023 pic.twitter.com/P3iMu1KQu6
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023
IPL 2023 Punjab Kings Player Atharva Taide