इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयपीएल२०२३ चा १६वा सीजन हळूहळू रंगत चालला असून प्रत्येक सामन्यानिशी रोमांच वाढत आहे. विशेषतः वीकेंडला डबल हेडर सामन्यांच्यावेळी उत्साह शिगेला पोहोचतो. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये या सिजनचा १२वा सामना नुकताच झाला. चेन्नईने मुंबईवर सात गडी राखून धमाकेदार विजय मिळवला. यासोबतच चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
काल शनिवार, ८ एप्रिलला मुंबई आणि चेन्नईमध्ये डबल हेडरचा हा दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या टीमने आरामात विजय मिळवला. मात्र, तरीही ते राजस्थान रॉयल्सला मागे टाकू शकले नाहीत. सध्या राजस्थान टीम तीन सामन्यात दोन विजयासह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सला ७ विकेटने हरवले असून चेन्नईचा ३ मॅचमधील हा दुसरा विजय आहे. पण ते राजस्थानला पहिल्या स्थानावरुन हटवू शकले नाहीत.
आता १२ व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलवर बघतील तर पाच टीम्सचे एकसमान चार-चार पॉइंट्स आहेत. फक्त नेट रनरेटच्या फरकामुळे राजस्थान रॉयल्सची टीम पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला हटवले असून चेन्नईने आपल्या दुसऱ्याविजयासह पंजाब किंग्सला मागे टाकलं. ते चौथ्या स्थानावर आहेत. गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहेत.
विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या तीन स्थानांवर आहेत. दिल्ली सलग तीन पराभवांसह नवव्या आणि मुंबई सलग दोन पराभवांसह आठव्या स्थानावर आहे. शेवटच्या स्थानावर अजूनही सनरायजर्स हैदराबादची टीम आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सहाव्या स्थानावर आहे
आयपीएल मध्ये दोन मोठे सामने एकाच दिवशी म्हणजे शनिवारी खेळले गेले. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला. त्यानंतर शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला, हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव होता.
IPL 2023 Points Table After match 12