मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियन प्रिमीयर लिग दरवर्षी रंगतदारच होत असते. पण यंदा या स्पर्धेने सुरुवातीपासून धक्कातंत्राचा टोन पकडला आहे. कोणता खेळाडू कोणत्या क्षणाला हिरो होईल आणि सामना जिंकून देईल याचा अंदाज नसतो. तसेच प्ले-ऑफच्या बाबतीत होणार आहे. कारण आत्ता पॉईंट टेबलमध्ये जे दिसतय, कदाचित ते येत्या आठ दिवसात बदललेलं असणार आहे.
आयपीएलमध्ये यावर्षी दिल्ली आणि सनरायझर्स सध्याच्या स्थितीला तळाशी आहेत. हीच स्थिती काही दिवसांपूर्वी मुंबईची होती. सध्या आठव्या क्रमांकाला असलेले कोलकाता नाईट रायडर्स सुरुवातीच्या पंधरा दिवसांमध्ये पहिल्या तीनमध्ये होते. आरसीबीला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मार खावा लागला. त्यानंतर त्यांनी कमबॅक केल्यामुळे आता पाचव्या क्रमांकाला आहेत. पण आता त्यांचे स्थान जैसे थे झाले आहे. त्यामुळे खालच्या संघांनी येत्या काही सामन्यांमध्ये विजय प्राप्त केले तर मधल्या क्रमांकांवर असलेल्या संघांना धोका पोहोचू शकतो. त्यात राजस्थान, आरसीबी, मुंबई आणि पंजाब या संघांचा समावेश आहे.
पंजाबचीही सुरुवात वाईटच झालेली होती. पण आता पंजाबने उत्तम कामगिरी केल्यामुळे सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाताचा नेट रनरेट हा पाचव्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे पुढचे दोन सामने आरसीबी हरले आणि कोलकाता जिंकले तर कोलकाता वरच्या क्रमांकाला मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कारण खालच्या संघांनी कमबॅक करत प्रस्थापित संघांना धक्का देण्याची आयपीएलची जुनी परंपरा आहे. मुंबई इंडियन्सने अश्याच प्रकारची धक्कादायक कामगिरी करून चषक जिंकला होता, हे कुणीही विसरलेले नाही. त्यामुळे सध्या तरी प्ले-ऑफचा मार्ग खडतर आहे, याची सर्वच संघांनी जाण ठेवली आहे.
यामुळे बिघडले गणित
शनिवारी रंगलेल्या आयपीएलच्या दोन सामन्यांमुळे गुणतालिकेचे गणित आणखी किचकट झाले. मुंबई इंडियन्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तर लखनऊ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर गेला. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचे पाणी पाजून दोन गुण पटकावले. आता दिल्लीला सुद्धा प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे.
IPL 2023 Ply off Teams Points Table Calculation