मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये जाण्याचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत, हे स्पष्ट झाल्यावर दिल्ली कॅपिटल्सची टीम फॉर्मात आली आहे. प्ले-ऑफसाठी संघर्ष करणाऱ्या पंजाबला त्यांनी पराभूत केल्यामुळे आता स्पर्धेत अधिकच रंगत आली आहे. त्यामुळे येते काही दिवस अतिशय उत्कंठावर्धक राहणार असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली कॅपिटल्सची टीम बुधवारचा सामना हरली असती तरीही त्यांना काहीच फरक पडला नसता. कारण तसेही ते प्ले-ऑफमध्ये जाणारच नव्हते. पण पंजाबसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. पंजाबने कालचा सामना जिंकला असता तर त्यांच्या खात्यात दोन गुण जोडले गेले असते. आणि पुढचा सामना जिंकून त्यांना १६ गुणांपर्यंत मजल मारून चुरस निर्माण करणे शक्य होते. गंमत म्हणजे पंजाबची गाडी आता १२ गुणांवरच थांबलेली आहे. त्यामुळे पुढचा सामना जिंकला तरीही त्यांना १४ गुण करता येतील, पण तोपर्यंत वरच्या संघांचे गुणही वाढलेले असतील.
https://twitter.com/IPL/status/1658881176453681152?s=20
सध्या स्पर्धेत गुजरात टायटन्सने आपली प्ले-ऑफमधील जागा निश्चित केली आहे. त्यानंतर चेन्नई आणि लखनौ हे दोन्ही संघ प्रत्येकी १५ गुणांवर आहेत. मुंबई १४ तर बंगळुरू, राजस्थान, कोलकाता आणि पंजाब प्रत्येकी १२ गुणांवर आहेत. हैदराबादचा संघ ८ गुणांसह पॉईंट टेबलच्या तळाला आहे. सध्या बंगळुरू आणि हैदराबाद या दोनच संघांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. हैदराबाद तर स्पर्धेत नाही, पण बंगळुरूला दोन्ही सामने जिंकून १६ गुणांपर्यंत मजल मारता येणार आहे. पण त्यांचा घोडा रोखण्यासाठी तळाशी असलेला हैदराबाद संघ प्रयत्न करेल. त्यांच्यात आज सामना रंगणार आहे.
विशेष म्हणजे मुंबईने शेवटचा साखळी सामना जिंकला तर त्यांचेही १६ गुण होतील. पण मुंबईलाही स्पर्धेतून बाहेर फेकण्यासाठी हैदराबाद प्रयत्न करेल. या दोघांमध्ये २१ मे रोजी अखेरचा साखळी सामना रंगणार आहे. बंगळुरूला प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी पहिले हैदराबाद आणि अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातला टक्कर द्यायची आहे. त्यामुळे सध्या तरी पॉईंट टेबल गोलमाल भूमिकेत असल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/IPL/status/1658879976660434944?s=20
पंजाब, कोलकाताचे काय?
पंजाबचा अखेरचा साखळी सामना राजस्थानविरुद्ध रंगणार आहे. राजस्थानही १२ गुणांसह प्ले-ऑफचे स्वप्न बघत आहे. राजस्थानचे स्वप्न भंग करण्यासाठी पंजाब नक्कीच प्रयत्न करेल. तर तिकडे १५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेला लखनौचा संघ कोलकाताला पराभूत करून प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. कोलकाताने हा सामना जिंकला तरीही त्यांचे १४ गुण होतील आणि १४ गुण घेणाऱ्या संघांपैकी नेट-रनरेटमध्ये जो अव्वल असेल तोच प्ले-अॉफमध्ये जाईल. कोलकाता त्या दृष्टीने फार मागे आहे.
https://twitter.com/IPL/status/1658849565427073028?s=20
IPL 2023 Play Off Scenario Teams Points Table