मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदाच्या आयपीएल प्ले-ऑफमध्ये गुजरात टायटन्स हा सर्वांत पहिले प्रवेश करणारा संघ ठरला आहे. खरे तर चेन्नईने देखील आपला मार्ग मोकळा केला असता, पण कोलकाताकडून पराभव झाल्यामुळे चेन्नईच्या वाट्याला प्रतिक्षा आली. आता गुजरात १३ सामन्यांमध्ये १८ गुण आहेत.
चेन्नई आणि मुंबई
गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईला पुढचा सामना कोणत्याही परिस्थितीत चांगल्या रनरेटने जिंकावा लागणार आहे. कारण तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचे अद्याप दोन सामने शिल्लक आहेत. आणि त्यांनी दोन्ही सामने चांगल्या रनरेटने जिंकले तर ते चेन्नईला मागे टाकू शकतात. सध्या मुंबईकडे १२ सामन्यांमधून १४ गुण आहेत. तर चेन्नईकडे १३ सामन्यांमधू १५ गुण आहेत.
लखनौ आणि बंगळुरू
याशिवाय लखनौ आणि बंगळुरू देखील चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकतात. या संघांचे देखील प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. १३ गुणांवर असलेल्या लखनौला दोन्ही सामने जिंकून १७ गुणांपर्यंत मजल मारणे शक्य आहे आणि बंगळुरूला सुद्धा पुढचे दोन्ही सामने जिंकून १२ गुणांवरून १६ गुणांवर मजल मारता येऊ शकते.
???????? ???? ??????! ✅
Presenting the first team to qualify for the #TATAIPL playoffs! #GTvSRH
??????? ?????? ???? pic.twitter.com/1std84Su6y
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2023
राजस्थान आणि कोलकाता
१५ गुणांवर असलेल्या चेन्नईचा अखेरच्या सामन्यात पराभव झाला तर ते प्ले-ऑफच्या बाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. दुसरीकडे राजस्थान आणि कोलकाता हे दोन्ही संघ प्रत्येकी १२ गुणांवर आहेत आणि आता त्यांच्याकडे केवळ एकच साखळी सामना शिल्लक आहे. त्यांनी आपला अखेरचा साखळी सामना जिंकला तरीही त्यांचे प्ले-ऑफमध्ये जाण्याचे चान्सेस कमीच आहेत. त्यातही त्यांना आशा ठेवायची असेल तर ती इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. पण १२ सामन्यांमध्ये १२ गुणांवर असलेल्या पंजाबला उर्वरित दोन्ही सामने जिंकून इतरांपुढे आव्हान निर्माण करणे अजूनही शक्य आहे.
दिल्ली-हैदराबाद आऊट
दोन दिवसांपूर्वी पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर सोमवारी गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर हैदराबादनेही तलवार खाली ठेवली आहे. हैदराबादकडे आणखी दोन साखळी सामने शिल्लक आहेत. त्यांनी गुजरातवर विजय मिळवला असता आणि पुढचे दोन्ही सामने जिंकले असते तर किमान सन्मानजनकरित्या बाहेर पडता आले असते.
The @gujarat_titans sealed their spot in the #TATAIPL 2023 Playoffs with an exceptional win at home ????
Here's a quick round-up of the #GTvSRH clash ?? pic.twitter.com/url82WNLi0
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
IPL 2023 Play Off Points Table Scenario