मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलचे सत्र ऐन भरात आले आहे. सुरुवातीला अडखळणारे संघ गती पकडू लागले आहेत. यात मुंबई इंडियन्सनेही नुकताच आरसीबीविरुद्ध विजय मिळविला आहे. मुंबईच्या या विजयाने संघाचे मनोबल वाढविले असताना या विजयापेक्षा रोहित शर्माच्या विकेटचीच चर्चा अधिक आहे. मुख्य म्हणजे रोहितच्या विकेटमुळे डीआरएसचा नवीन वाद निर्माण झाला आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला डीआरएस अंतर्गत एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले होते. त्यावर मोहम्मद कैफ, युवराज सिंग आणि मुनाफ पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रोहितलाही त्या विकेटचे आश्चर्य वाटले होते. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही तो रिप्ले पाहत होता आणि निर्णयावर विश्वास बसत नव्हता. रोहितला वानिंदू हसरंगाच्या ५व्या षटकातील शेवटचा चेंडू क्रीजच्या पलीकडे खेळायचा होता. तो पूर्णपणे चुकला. चेंडू पॅडला लागला. यावर आरसीबीने डीआरएस घेतला.
https://twitter.com/munafpa99881129/status/1656006261597691904?s=20
त्यानंतर तिसऱ्या पंचाने त्याला आऊट घोषित केले. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. रोहित ३.५ मीटरपेक्षा जास्त अंतराने क्रीजच्या बाहेर होता. अशा परिस्थितीत त्याला बाद करणे समजण्यापलीकडे होते. यावर मुनाफ पटेलने अंतर स्पष्ट केले आणि लिहिले, आता डीआरएससाठीही डीआरएस घ्यावे लागेल. दुर्दैवी रोहित शर्मा. जनता काय म्हणते, बाहेर आहे की नाही? त्यावर कैफने लिहिले आहे की, ‘हॅलो डीआरएस हे जरा जास्तच आहे. तो एलबीडब्ल्यू आऊट कसा होऊ शकतो.’ मुख्य म्हणजे या प्रकरणावर आता स्टार स्पोर्ट्स वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे.
https://twitter.com/MohammadKaif/status/1656000359436017666?s=20
IPL 2023 Mumbai Rohit Sharma DRS Controversy