इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयपीएल 2023 मध्ये, चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि 2008 चे चॅम्पियन राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी खेळत असून मैदानात उतरल्यानंतर त्याने एक खास विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाचे २०० सामने कर्णधार करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
धोनीने सीएसकेसाठी या सामन्यासह 200 सामन्यांचे नेतृत्व केले आहे. याशिवाय तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधारही होता. संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या हस्ते धोनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत चित्रा श्रीनिवासन आणि रूपा गुरुनाथही उपस्थित होते.
धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये विजेतेपद पटकावले होते. याशिवाय त्याने आपल्या संघाला 15 पैकी 11 वेळा अंतिम चारमध्ये नेले आहे. चार वेळा ट्रॉफी जिंकण्याबरोबरच हा संघ पाच वेळा उपविजेताही ठरला आहे. धोनीने आजच्या सामन्यापर्यंत एकूण 213 सामन्यांचे (CSK/RPS) नेतृत्व केले आहे. यापैकी त्याने 125 सामने जिंकले आहेत. याशिवाय 87 सामने हरले आहेत. एक सामना अनिर्णित आहे. त्याची विजयाची टक्केवारी ५८.९६ आहे. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
Mr N Srinivasan, former Chairman of the ICC, former President of BCCI and TNCA, Mrs. Chitra Srinivasan and Mrs Rupa Gurunath present @msdhoni with a special memento commemorating the very special 200th ?#TATAIPL | #CSKvRR | @ChennaiIPL pic.twitter.com/nixs6qsq2P
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
2016 मध्ये CSK वर बंदी असताना, धोनीने एका मोसमात 14 सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स (RPS) चे नेतृत्व केले. यातील त्यांच्या संघाने पाच सामने जिंकले होते तर नऊ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता. हे 14 सामने काढले तर आजच्या सामन्यापूर्वी धोनीने 199 सामन्यांमध्ये CSK चे नेतृत्व केले आहे. यापैकी सीएसकेने 120 सामने जिंकले आहेत, तर 78 सामने पराभवाला सामोरे गेले आहेत. एक सामना अनिर्णित आहे. CSK चा कर्णधार म्हणून धोनीच्या विजयाची टक्केवारी 60.30 आहे.
41 वर्षीय धोनीचे हे शेवटचे आयपीएल असू शकते, असे मानले जात आहे. धोनीशिवाय रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 146 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. यापैकी मुंबईने 80 सामने जिंकले असून 62 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. चार सामने बरोबरीत आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 140 सामन्यांत नेतृत्व केले आहे. यातील 64 सामने आरसीबीने जिंकले आहेत, तर 69 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन सामने टाय झाले असून चार सामने अनिर्णित राहिले आहेत.
आयपीएलमधील धोनीचा फलंदाज म्हणून विक्रमही उत्कृष्ट राहिला आहे. एकूण 237 सामन्यांमध्ये त्याने 39.09 च्या सरासरीने आणि 135.54 च्या स्ट्राइक रेटने 5004 धावा केल्या आहेत. यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 84 धावा आहे. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले. त्याने कसोटीत 4876 धावा, एकदिवसीय सामन्यात 10,773 धावा आणि T20 मध्ये 1617 धावा केल्या आहेत.
IPL 2023 MS Dhoni Record 200 Matches Captain