मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोक्यावरील केस हे व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, डोक्यावर केस नसतील तर नैराश्या येऊ शकते, एका क्रिकेट खेळाडूचे देखील असेच झाले होते, परंतु आता त्यातून तो बाहेर आला आहे. मोहित शर्मा हे नाव आयपीएल प्रेमी हे विसरू शकत नाही. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जच्या चाहते तर मोहित शर्माच्या गोलंदाजीवर फिदा असत.
सन २०२० मध्ये शेवटचा सामना खेळल्यानंतर आता त्याने धमाकेदार पुनरागमन केले आहे.
विशेष म्हणजे ज्या संघासोबत तो शेवटचा सामना खेळला होता. आता तीन वर्षांनंतर तो त्याच संघाच्या विरोधात परतला आहे. आयपीएलमध्ये पुनरागमन करताना, मोहित शर्माला त्याच्या योग्य गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, आयपीएल २०१९ आणि २०२० मध्ये एकच सामना खेळलेल्या मोहितला २०२२ मध्ये गुजरातने आपला नेट बॉलर बनवले होते.
मोहितची प्रबळ इच्छाशक्ती आणि चैतन्यच त्याला प्रेरणा देत राहिले. दरम्यान, तो देशांतर्गत क्रिकेटही खेळत राहिला. पाठीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा त्याला सतत प्रेरित करत होते. त्याने मोहित शर्मालाही संघात येण्यासाठी बोलावले. मोहितने आपल्या यशाचे श्रेय संघातील वातावरण आणि प्रशिक्षकांना दिले.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही या कामगिरीचे सर्व श्रेय मोहितच्या मेहनतीला दिले. पंड्या म्हणाला, मोहित आमच्यासोबत नेट बॉलर म्हणून सामील झाला होता. पण, तो संधीची वाट पाहत होता. आता संधी मिळाल्यावर त्याने चमत्कार केला आहे. या हुशार मध्यमगती गोलंदाजाने केवळ यलो आर्मीमध्ये फक्त आपली गोलंदाजीचं दाखवून दिली नाही तर २०१४ च्या मोसमात २३ विकेट्स घेऊन पर्पल कॅपधारक देखील होता. २०१५ मध्ये महेंद्रसिंग धोनीने त्याला ५० षटकांचा विश्वचषक खेळण्याची संधी दिली होता. भुवनेश्वर कुमारऐवजी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.
विशेषत: चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी मोहीत हे नाव नवीन नाहीच. तो एक चतूर मध्यमगती गोलंदाज आहे. आता तीन वर्षांनंतर तो त्याच संघाविरोधात परतला. गुजरात टायटन्सकडून खेळत असलेल्या मोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्ध चार षटकांत अवघ्या १८ धावांत दोन विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज असल्याचे सिद्ध केले.
महत्त्वाचे असे की, मोहित शर्माने फॉर्मात असताना केस गळण्याचे कारण दिले होते. हरियाणाच्या या वेगवान गोलंदाजाने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, माझे केस येथे गळत आहेत आणि माझा आत्मविश्वास कमी होत आहे. हरियाणाच्या मोहित शर्माने एकूण २६ वन डे सामन्यात ३१विकेट्स आणि आठ टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून ६ बळी घेतले आहेत. मात्र मोहितचा आयपीएलमध्ये गेल्या दोन वर्षे कठीण काळ होता. पण अखेर त्याने यंदा पुनरागमन केले आहे.
https://twitter.com/IPL/status/1646732315559866369?s=20
IPL 2023 Mohit Sharma After 3 Years Come Back