मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा आक्रमक पवित्रा जास्त चर्चेत आहे. फलंदाजी करताना असो वा क्षेत्ररक्षण करताना असो, विराटच्या चेहऱ्यावर सतत आक्रमक भाव बघायला मिळत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यानंतर माजी डावखुरा सलामी फलंदाज गौतम गंभीर याच्यासोबतच्या वादामुळे विराट चर्चेत आहे.
विराट आणि गांगुली यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. एकमेकांना अनफॉलो करत किंवा आमनेसामने आले तरी एकमेकांना टाळत पुढे गेले. पण गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात थेट मैदानावरच बाचाबाची झाली आणि ती अख्ख्या जगाने बघितली. या बाचाबाचीचे फोटो आणि व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. विराटच्या अग्रेशनचे कौतुक करताना नेटकऱ्यांनी त्याला शांतता राखण्याचाही सल्ला दिला आहे.
सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होता. लखनऊच्या इकाना स्टेडियमवरचा हा सामना लोएस्ट स्कोअरमध्ये खेळला गेला. सुरुवातीला बंगलोरला २० षटकांत केवळ १२६ धावा बनवता आल्या. आणि त्यानंतर लखनऊची अख्खी टीम १०८ धावांत गारद झाली. या दोन्ही संघांचा यापूर्वीचा सामना बंगलोरमध्ये झाला होता आणि लखनऊने जिंकला होता. त्यामुळे लखनऊच्या होमग्राऊंडवर वचपा काढल्याचा आनंद विराटच्या अग्रेशनमधून दिसत होता.
https://twitter.com/Cricketracker/status/1653099549618229248?s=20
याच अग्रेशनमध्ये तो लखनऊची फलंदाजी सुरू असताना १७व्या षटकात लखनऊच्या नवीन उल हक् याच्यासोबत भिडला. दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी क्षेत्ररक्षण करताना विराट अतिरिक्त आक्रमकता दाखवत असल्यामुळे अमित मिश्रासोबतही त्याचा वाद झाला. पंचांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. सामना संपल्यानंतरही हा वाद सुरू होता. हात मिळविताना विराट आणि नवीन उल हक् यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली. ग्लेन मॅक्सवेलने मध्यस्थी करून वाद थांबवला.
https://twitter.com/koliesque/status/1653082409515257856?s=20
हे तर ‘गंभीर’ आहे
सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या दिशेने आक्रमकपणे चालून येत असल्याचे दिसत होते. सहकारी खेळाडू दोघांनाही समजावत असताना दोघेही हातवारे करून आक्रमकपणे एकमेकांसोबत बोलत असल्याचे दिसत होते. या बाचाबाचीचा व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे कुणी गंभीरला तर कुणी विराटला ट्रोल करताना दिसत आहेत.
https://twitter.com/Hydrogen_45/status/1653107420896579584?s=20
बीसीसीआयकडून कारवाई
आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची दखल भारतीय क्रिकेट नियमक आयोगाने घेतली आहे. लखनौ येथील श्री अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे दोघांच्या सामना शुल्काच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दोघांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ अंतर्गत लेव्हल २ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर बीसीसीआयने ही कारवाई केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1653220434702381057?s=20
IPL 2023 Gautam Gambhir Virat Kohli Clash Video Viral