बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

IPL : आजही अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाला तर कोण जिंकणार? कुणाला ट्रॉफी मिळणार?

by Gautam Sancheti
मे 29, 2023 | 11:30 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
cricket stadium

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएल २०२३ चा विजेतेपदाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. खरे तर हा सामना काल होणार होता. मात्र, पावसामुळे तो रद्द झाला आणि आज हा सामना घेण्याचे निश्चित झाले आहे.  चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. एकूण ७३ अतिशय मनोरंजक सामने खेळले गेले. आजच्या सामन्याने जगातील या सर्वात मोठ्या लीगचा प्रवास संपणार आहे.

आयपीएल २०१९ नंतर प्रथमच, आयपीएल होम आणि अवे फॉरमॅटमध्ये परतले. हा हंगाम सुपरहिट ठरला आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत प्लेऑफचे संघ निश्चित झाले नाहीत. या हंगामाची सुरुवात अहमदाबादमध्येच चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्याने झाली आणि त्याच सामन्याने शेवट होत आहे. सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजे संध्याकाळी ७ वाजता होईल.

आता कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर २ सामनाही पावसामुळे ४५ मिनिटांसाठी खंडित झाला होता. नाणेफेक संध्याकाळी ७ ऐवजी ७.४५ वाजता झाली, तर सामना रात्री ८ वाजता सुरू झाला. मात्र, पूर्ण सामना खेळला गेला. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील फायनलमध्येही पावसाचा धोका आहे. या सामन्यात पाऊस पडल्यास आणि सामना रद्द झाल्यास काय होईल ते जाणून घेऊया.

गेल्या काही दिवसांत देशातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे आणि याचा परिणाम आयपीएल २०२३ च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यावर होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की २८ मे रोजी अहमदाबादच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ असेल. चाहत्यांचीही तशीच अपेक्षा असेल. मात्र, Accuweather च्या अहवालानुसार अहमदाबादमध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी पावसाची ४० टक्के शक्यता आहे. अहवालानुसार, अहमदाबादमध्ये एकूण दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सूर्यास्तानंतर पावसासह संध्याकाळी ५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.

सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल, असे भारतीय हवामान खात्याने निश्चितपणे सांगितले होते. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळू शकते. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात जसजसा खेळ पुढे सरकत गेला, तसतशी फलंदाजीची परिस्थिती अधिक चांगली झाली. ओलाव्यामुळे गोलंदाजांना पहिल्या काही षटकांमध्ये कमी उसळी मिळत होती. नंतर फलंदाजी करणे खूप सोपे झाले.

आयपीएल २०२२ मध्ये फायनलसाठी राखीव दिवस होता, परंतु बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्लेऑफ वेळापत्रकानुसार यंदा आयपीएल २०२३ फायनलसाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यामुळे, आयपीएल २०२३ चा अंतिम विजेता ठरलेल्या सामन्याच्या दिवशीच (रविवार, २८ मे) ठरवला जाईल.

सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटे किंवा दोन तास उपलब्ध असतील. जर आयपीएल २०२३ चा अंतिम सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू झाला, तर कमीत कमी पाच षटकांच्या सामन्यांसाठी कट ऑफ वेळ रात्री ११.५६ पर्यंत असेल. जर सामना रात्री ८ वाजता सुरू झाला, तर पाच षटकांची कट ऑफ वेळ १२.२६ पर्यंत असेल. म्हणजेच या वेळेपर्यंत पंच किमान पाच षटकांच्या सामन्याची वाट पाहतील.

जर एखाद्या संघाने पहिल्या डावात आपली सर्व षटके खेळली तर दुसऱ्या संघालाही डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्यासाठी पाच षटके खेळावी लागतील. इतर संघाने पाच षटके खेळल्यानंतर सामना पावसामुळे वाहून गेला तर, विजेता ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाईल. काही कारणास्तव दोन्ही किंवा कोणताही एक संघ पाच षटके खेळू शकला नाही आणि कट ऑफ टाइम ओलांडल्यानंतर पाऊस थांबला, तर काही नियम लागू केले जातील.

दोन्ही संघ सुपर ओव्हर खेळतील आणि सुपर ओव्हरमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल हे ठरविले जाईल. विजेत्या संघाचे निर्धारण करण्यासाठी उपलब्ध वेळेत परिस्थिती सुपर ओव्हरला परवानगी देत ​​नसेल, तर साखळी फेरीत गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेला संघ विजेता मानला जाईल. साखळी फेरीअखेर गुजरात २० गुणांसह अव्वल, तर चेन्नई १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होते. पावसामुळे सामना अजिबात झाला नाही तर गुजरात टायटन्सचा संघ चॅम्पियन होईल.

IPL 2023 Final Match Rain Forecast CSK GT

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत आता संजय राऊतांची एण्ट्री… काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दाव्यावर म्हणाले….

Next Post

IPL आजच्या अंतिम सामन्याला प्रेक्षक येणार? कालचेच तिकीट चालणार की?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
modi 111
संमिश्र वार्ता

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

सप्टेंबर 10, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

सप्टेंबर 10, 2025
Next Post
FxO3SmBaEAAu4yq

IPL आजच्या अंतिम सामन्याला प्रेक्षक येणार? कालचेच तिकीट चालणार की?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011