इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पावसामुळे रविवारी (२८ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा अंतिम सामना होऊ शकला नाही. आता आज, सोमवारी राखीव दिवशी चॅम्पियनचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजच्या सामन्यात एक टेन्शन म्हणजे प्रेक्षक येणार का
अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. रात्री ११ वाजता पाऊस उशिरा थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागेल. त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला. आता तो सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून राखीव दिवशी खेळला जाईल. नऊ वाजता पाऊस थांबला होता आणि मैदान जवळपास खेळण्यायोग्य झाले होते, पण पाऊस पुन्हा आला. त्यानंतर रात्री ११ वाजता पाऊस थांबला.
समालोचक सायमन डौल यांच्याशी बोलताना पंच नितीन मेनन आणि रॉड टकर म्हणाले, “रात्री नऊच्या सुमारास परिस्थिती चांगली होती. तीन तासांच्या पावसानंतरही आम्ही खूप आशावादी होतो पण दुर्दैवाने पाऊस पुन्हा आला. आम्ही रात्री उशिरा 12:06 पर्यंत सामना सुरू करू शकतो. मैदान आणि खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राउंड्समनला किमान एक तास लागतो. रात्री 11 वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही तर उद्या (सोमवारी) पुन्हा येऊ.”
आयपीएलने या सामन्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी लिहिले – आयपीएलचा अंतिम सामना २९ मे संध्याकाळी ७.३० पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रिझर्व्ह डेला होणार आहे. आजची भौतिक तिकिटे उद्या वैध असतील. आम्ही तुम्हाला तिकीट सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो.
प्रेक्षक येणार का
काल, रविवारची सुटी असल्याने प्रेक्षकांची संख्या मोठी होती. आजही कालचीच तिकीटे चालणार असली तरी प्रेक्षक वर्कींग डे मुळे येऊ शकतील का असा प्रश्नच आहे. तसेच, आजही पावसाचे वातावरण राहणार असल्याने प्रेक्षक येतील का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. काहींच्या मते निम्म्याहून कमी प्रेक्षक आज येऊ शकतील.
https://twitter.com/IPL/status/1662886453951733760?s=20
IPL 2023 CSK vs GT Final Match Tickets Rain Audience