मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक आयोग (BCCI) ने इंडियन प्रिमिअर लीग (IPL) 2023च्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक आणि ठिकाणाचे तपशील जाहीर केले आहे. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. चाहत्यांना दररोज आयपीएलमधील रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.
बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफ आणि फायनलचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. 23 मे ते 28 मे 2023 या कालावधीत या हंगामातील प्लेऑफ आणि अंतिम सामने खेळले जातील, ज्याचे ठिकाण बीसीसीआयने नुकतेच जाहीर केले आहे. वास्तविक, आयपीएलच्या 16व्या हंगामाबाबत बीसीसीआयने प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे ठिकाण जाहीर केले आहे.
चेन्नई आणि अहमदाबादमध्ये 23 मे ते 28 मे 2023 दरम्यान प्लेऑफ आणि फायनल खेळले जातील. पात्रता-1 23 मे रोजी चेन्नईच्या M.A. चिदंबरम स्टेडियमवर, २४ मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 26 आणि 28 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर 2 आणि टाटा IPL फायनल होणार आहे.
IPL 2023 च्या प्लेऑफ आणि फायनलचे संपूर्ण वेळापत्रक असे
२३ मे २०२३ – पात्रता १ – संघ १ विरुद्ध संघ २ – एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
२४ मे २०२३ – एलिमिनेटर – संघ ३ विरुद्ध संघ ४ – एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
२६ मे २०२३ – क्वालिफायर २ – एलिमिनेटरचा विजेता विरुद्ध क्वालिफायर १ मधील पराभूत – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
२८ मे २०२३ – अंतिम सामना – क्वालिफायर १ चा विजेता वि क्वालिफायर २ चा विजेता – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
? NEWS ?
BCCI Announces Schedule and Venue Details For #TATAIPL 2023 Playoffs And Final.
Details ?https://t.co/JBLIwpUZyf
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
IPL 2023 BCCI Announces Play off and Final Match Place Date