मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही, असे म्हटले जाते. पण बरेचदा अशक्य वाटणाऱ्या घटनांचे कौतुक होत असले तरीही त्या आयोजकांना महागात पडत असतात. त्यातलीच एक घटना शनिवारी घडली. पंजाब किंग्सच्या अर्शदीपसिंगने दोन वेळा लागोपाठ स्टम्प्स तोडले. त्याला विकेट मिळाल्या, पण आयोजकांचे तब्बल ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले.
पंजाब किंग्स आणि मुंबई विरुद्धच्या सामन्याचा थरार क्रिकेटचे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. हा सामना जवळपास मुंबईच्या बाजुने झुकलेला आहे असे वाटत असताना पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने शेवटच्या शटकात दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. मुंबईचे फलंदाज तिलक वर्मा आणि निहाल वढेरा या दोन्ही फलंदाजांना अर्शदीपने लागोपाठ पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दोघांनाही त्याने क्लीन बोल्ड केले. आणि दोन्ही वेळा मिडल स्टम्प्स तोडले. एखादा रिप्ले वाटावा अश्या लागोपाठ सारख्या पद्धतीने या विकेट्स त्याने घेतल्या. पंजाबने मुंबईवर १३ धावांनी विजय मिळवला. आणि आयपीएलच्या इतिहासातील या सर्वांत अनोख्या विकेट्स ठरल्या. पण त्या आयोजकांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. कारण या स्टम्प्सच्या एका सेटची किंमत २५ ते ३० लाख एवढी आहे. त्यानुसार दोन्ही सेट्सची किंमत ५० ते ६० लाखांच्या घरात जाते. अर्शदीपने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना दिलेला आनंद आयोजकांना कायम लक्षात राहणार आहे.
असे काय आहे स्टम्प्समध्ये?
आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या या स्टम्स्पची किंमत एवढी का आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु, या स्टम्प्सचेही वैशिष्ट्यही तसेच आहे. या स्टम्पमध्ये एलईडी लाईट्स आहेत. क्लोज रन आऊट आणि स्टम्पिंगमध्ये ते थर्ड अंपायरला खूप मदत करते. चेंडू किंवा हात या स्टम्पला स्पर्श करताच, त्यांचे एलईडी लागतात. या स्टम्प्समध्ये माईकही आहेत, त्यामुळे चेंडू आणि बॅटमधील संपर्क कळतो. या स्टम्पला कॅमेरेही जोडण्यात आले आहेत.
रहाणेच्या पगारापेक्षा महाग
अर्शदीपने आयपीएलमध्ये तोडलेल्या स्टम्प्स सेटची किंमत ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत आहे. ही किंमत आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूंच्या पगारापेक्षा जास्त आहे. यामध्ये आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे याचाही समावेश आहे.
https://twitter.com/DanielManthri/status/1650009878596026368?s=20
IPL 2023 Arshadip Singh Stump Broke Price