इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयपीएलच्या १५ व्या हंगामातील अंतिम सामन्यात विजय मिळवून गुजरात टायटन्सने यंदाचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेले कमी धावसंख्येचे आव्हान गुजरात टायटन्सने सहज पार केले. या हंगामात १६ पैकी १३ सामन्यात नाणेफेक हरणाऱ्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकली. या सामन्यात त्याचे नशीब पालटणार असे वाटत असतानाच ते सामन्यात पराभूत झाले. तरीही आयपीएल आयोजकांकडून राजस्थान रॉयल्सवर बक्षिसाच्या स्वरूपात पैशांचा पाऊस पडला आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान विजेता ठरला होता. परंतु चौदा वर्षांनंंतरही त्यांना इतिहासाची पुनरावृत्ती करता आली नाही. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नवख्या गुजरात संघाने राजस्थानचा ७ गड्यांनी पराभव केला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने संयमाने खेळ करत विजेतेपदाला गवसणी घातली. हार्दिक पंड्याने स्वतः या सामन्यात चमकदार कामगिरी केली. गोलंदाजी करताना त्याने राजस्थानचे ३ गडी टिपले. फलंदाजी करताना आवश्यक ३४ धावा केल्या आणि सामानावीर ठरला.
https://twitter.com/IPL/status/1531006575535861761?s=20&t=9PQSipW9xBk6sfO6MLaqNA
आयपीएल २०२२ मध्ये विजेत्या आणि विरोधी संघांवर पैशांचा पाऊस पडला. आयपीएल आयोजकांकडून मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेबद्दल सांगायचे झाल्यास गुजरात टायटन्सला २० कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. तसेच मानाचा आयपीएल चषकही मिळाला आहे. विरोधी राजस्थान संघावरही बक्षीसांची बरसात झाली. पराभूत झालेल्या राजस्थान संघाला साडेबारा कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर संघाला ७ कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावरच्या लखनऊ सुपर जायंट्सला साडेसहा कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
विजेता – गुजरात टायटन्स १२ कोटी रुपये
उपविजेता – राजस्थान रॉयल्स १२.५ कोटी रुपये
तिसरा क्रमांक – रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर ७ कोटी रुपये
चौथा क्रमांक – लखनऊ सुपर जायंट्स ६.५ कोटी रुपये