मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय नागरिक क्रिकेट या खेळाचे शौकीन आहेत, असे म्हटले जाते. क्रिकेट म्हटले की, बहुतांश नागरिकांच्या याकडे लक्ष वेधले जाते. लवकरच यंदाच्या आयपीएल हंगाम सुरू होणार आहे त्यामुळे त्यासंदर्भातली चर्चा सत्र सर्वत्र सुरू आहेत आयपीएलचा 15 वा हंगाम पूर्वीपेक्षा मोठा आणि चांगला असेल. यावेळी ट्रॉफीसाठी दहा संघांमध्ये लढत होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने कोरोना व्हायरस लक्षात घेऊन काही नवीन नियम केले आहेत.
क्रिकबझच्या अहवालानुसार, बायो बबलचे उल्लंघन केल्याबद्दल एका सामन्याची बंदी, सांघिक गुण वजा करणे आणि 1 कोटीपर्यंत दंडाची तरतूद आहे. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोविड -19 मुळे आयपीएलचा शेवटचा हंगाम पुढे ढकलावा लागला होता. बायो बबल खेळाडू किंवा कुटुंबातील सदस्य, संघ मालक किंवा त्यांच्याशी संबंधितांना बायो बबलचे उल्लंघन केल्यास, त्यांना देखील परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
आयपीएलच्या या नवीन हंगामातील दुसरा सर्वात मोठा बदल डीआरएसमध्ये आला आहे. दोन्ही डावात प्रत्येक संघाला आणखी एक डीआरएस देण्यात आला आहे. यापूर्वी संघाला एका डावात एक डीआरएस घेण्याची संधी होती, ती आता 2 करण्यात आली आहे.प्रत्येक संघाला 4 डीआरएस मिळतील. एका सामन्यात एकूण 8 डीआरएस घेतले जाऊ शकतात.
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) सुचवलेले नवीन नियम बीसीसीआयने त्वरीत स्वीकारले आहेत. आता या नवीन नियमानुसार, झेल बाद झाल्यास, फक्त नवीन फलंदाजाने स्ट्राईक घ्यावा. आधी नियम असा होता की, जर दोन्ही खेळाडूंनी झेल घेण्यापूर्वी एकमेकांना ओलांडले तर नवीन फलंदाज नॉन-स्ट्रायकिंग एंडला जायचे.
एखाद्या संघाने जर आयपीएल 2022 च्या हंगामात बाहेरील व्यक्तीला संघात आणले. त्यानंतर त्याला एक कोटीपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. दुसरीकडे, पुन्हा अशी चूक केल्यास संघाचे गुण वजा केले जातील.
बायो बबल तुटल्यास, खेळाडूला 7 दिवस क्वारंटाईन करावे लागेल. त्याचबरोबर त्या काळात जेवढे सामने होतील, त्याचे पैसेही मिळणार नाहीत. दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास क्वारंटाईनसह सामन्यावर बंदी घालण्यात येईल. तिसरी चूक केल्यास, संपूर्ण हंगामासाठी बाहेर ठेवले जाईल.