शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

IPL 2022: मुंबई इंडियन्ससाठी आज ‘करो या मरो’; रोहित शर्माचीही कसोटी

by Gautam Sancheti
एप्रिल 21, 2022 | 1:53 pm
in राज्य
0
Mumbai Indians logo design IPL 300x300 1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सलग सहा पराभवानंतर आयपीएलमधून बाद होण्याच्या मार्गावर असलेला मुंबई इंडियन्स (MI), गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध मॅच खेळणार आहे. आतापर्यंत पाच वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकले आहे. पण यंदा मात्र एकही सामना त्यांनी जिंकलेला नाही. गुरुवारी चेन्नई विरुद्ध ते हरल्यास त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. गतविजेत्या चेन्नईची स्थितीही यावर्षी फारशी चांगली नाही. ही टीमदेखील सहापैकी पाच सामने पराभूत झाली आहे.

मुंबईसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म, ज्याने सहा सामन्यांत केवळ ११४ धावा केल्या आहेत. मुंबईला प्रथम खेळताना लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल किंवा मोठी धावसंख्या करायची असेल, तर रोहितला मोठी खेळी खेळावी लागेल. तरूण फलंदाज इशान किशनलाही त्याची १५.२५ कोटी रुपयांची किंमतीला जागता आलेले नाही. त्याने सहा सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने १९१हून अधिक धावा केल्या आहेत. डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यांच्यावर आता काही जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

अष्टपैलू किरॉन पोलार्डनेही आतापर्यंत निराश केले आहे. त्याची सामना जिंकणारी प्रतिमा आता मलीन होत चालली आहे. तो आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला असून त्याने केवळ ८२ धावा केल्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या सामन्यामध्ये मुंबईकडे चांगली फलंदाजी आहे. ती चेन्नईविरुद्ध लढण्यासाठी मदतीची ठरु शकते. मुंबईसाठी फलंदाजीपेक्षा गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह वगळता त्याच्या इतर गोलंदाजांनी आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, बेसिल थम्पी किंवा मुख्य फिरकीपटू मुरुगन अश्विन यांना आता सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मिल्सने तीन षटकात ५४ धावा दिल्या, तर उनाडकट आणि अश्विनने अनुक्रमे ३२ आणि ३३ धावा दिल्या. मुंबईने फॅबियन ऍलनचा प्रयत्न केला पण तोही चार षटकांत ४६ धावा गमावला. ऋतुराज गायकवाडचे फॉर्ममध्ये परतणे चेन्नईसाठी सकारात्मक संकेत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या आक्रमक फलंदाजीचे उत्तम उदाहरण मांडले होते, पण गुजरातविरुद्ध तेही फारशी कमला दाखवू शकले नाहीत. कर्णधार रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी फिनिशरची उत्तम भूमिका बजावू शकतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बलात्कार करणाऱ्यांना थेट बनवणार नपुंसक; या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा

Next Post

मोबाईल हॉटस्पॉट किंवा वायफाय देताय? आधी हे वाचा, मग ठरवा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
plan wifi

मोबाईल हॉटस्पॉट किंवा वायफाय देताय? आधी हे वाचा, मग ठरवा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011