मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वच क्रिकेट प्रेमींच्या उत्सुकतेचा आणि आवडीचा विषय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ब्रॉडकास्टरच्या आदेशाचे पालन करत दि. 26 मार्चपासून स्पर्धा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. ही लीग स्पर्धा एकूण 65 दिवस चालणार असून अंतिम सामना दि. 29 मे रोजी होणार आहे. साखळी टप्प्यातील 70 सामन्यांच्या ठिकाणाबाबत बोलायचे झाले तर मुंबईत एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यात होणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि लीगच्या सुरू आणि समाप्तीच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र, लीगचे पूर्ण वेळापत्रक येणे बाकी आहे. आयपीएल 2022 लीग टप्प्यातील 20-20 सामने मुंबईतील वानखेडे ( 20 ) आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर ( 20 ) सामने होणार आहेत. त्याचवेळी ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत.
https://twitter.com/IPL/status/1499629462354333698?s=20&t=Fb7dWj_BhNtHv64MLDYLhA
आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल म्हणाले की, ‘यावेळी आयपीएलचे सामने प्रेक्षकांच्या उपस्थितीत होतील. मात्र, प्रेक्षक 50 टक्के असतील की 25 टक्के असतील याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार स्टेडियमच्या क्षमतेनुसार प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार आहे. आयपीएल 2022 मध्ये प्रथमच 10 संघ सहभागी होत आहेत. या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ लीगचा भाग बनले आहेत. यापूर्वी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी लीगसाठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू होता आणि त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
असे आहे यंदाच्या आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक