अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २६ मार्चपासून सुरू होत आहे. यावेळी पहिला सामना गेल्या वर्षीचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी T20 स्पर्धा आहे. यावेळी केवळ खेळाडूच नाही तर या स्पर्धेत काही उत्कृष्ट सादरकर्ते आणि कॉमेंट्रेटरदेखील आपल्याला बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे आयपीएल २०२२च्या कॉमेंट्रीमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी, बंगाली भाषांचाही समावेश असून, त्यासाठी विविध भाषिकांची निवडही करण्यात आली आहे.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि रवी शास्त्री सारखे दिग्गज आयपीएलच्या १५व्या कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. तसेच हर्षा भोगले, सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोप्रा, इयान बिशप, अॅलन विल्किन्स, पॉमी एमबांगवा, निक नाइट, डॅनी मॉरिसन, सायमन डॉल, मॅथ्यू हेडन आणि केविन पीटरसन इंग्लिश कॉमेंट्री करताना दिसतील. या कॉमेंट्रेटर्सला म्हणजेच समालोचकांना आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी १९ दशलक्ष ते ३८ दशलक्ष रुपये मिळणार आहेत.
आयपीएलच्या या हंगामासाठी हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पाटील, निखिल चोप्रा, तान्या पुरोहित, किरण मोरे, जतिन सप्रू, सुरेन सुंदरम, रवी शास्त्री आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे. मात्र, वेळोवेळी इंग्लिश संघातील काही समालोचकही हिंदी कॉमेंट्री करताना दिसतात. त्यांना या सीझनसाठी ८० हजार डॉलर ते ३.५ लाख डॉलर्स (६१ लाख ते २.६७ कोटी रुपये) मिळणार आहेत.
कुणाल दाते, प्रसन्न संत, चेतन्या संत, स्नेहल प्रधान आणि संदीप पाटील यांसारखे दिग्गज आयपीएल २०२२ मध्ये मराठी भाषेत कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.
अनंत त्यागी, नेरोली मेडोज, स्कॉट स्टायरिस आणि ग्रॅम स्वान हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सिलेक्ट डगआउटमध्ये बसलेले दिसतील. या इंग्रजी समालोचकांना संपूर्ण हंगामासाठी ५ लाख ते ७ लाख डॉलर (३.८ कोटी ते ५.३४ कोटी रुपये) मिळणार आहेत. मात्र, आता या या नावांमध्ये आणखी काही नावे जोडली जाऊ शकतात.