इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडियन प्रिमिअर लीगचा पंधरावा हंगाम अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे कर्णधारपद यंदा महेंद्रसिंग धोनीकडे असणार नाही. त्याच्याजागी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आता संघाचा कर्णधार असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने तशी अधिकृत घोषणा आज केली आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये अतिशय शानदार प्रदर्शन केले आहे. संघाला आयपीएल चषकही मिळवून दिला आहे. मात्र, आता संघाचे नेतृत्व बदलण्यात आले आहे. धोनीने २०१९मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो केवळ आयपीएलमध्येच खेळत आहे. त्यातही त्याच्याकडे चेन्नईची धुरा होती. आता हा संघ रविंद्र जडेजाकडे देण्यात आला आहे. धोनी बरोबरच सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व यापूर्वी केले आहे. त्यामुळे चेन्नईला आता तिसरा कर्णधार मिळाला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने १३० सामने जिंकले आहेत. आता रविंद्र जडेजा कसे नेतृत्व करतो, आयपीएल १५च्या हंगामात चेन्नई कशी कामगिरी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
? Official Statement ?#WhistlePodu #Yellove ?? @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022