इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 लिलावात सध्या चर्चा होतेय ती जुही चावलाच्या कन्येची. हा लिलाव बंगळुरू येथील हॉटेल आयटीसी गार्डेनिया येथे होत आहे. सोशल मीडियावर आयपीएल लिलाव सतत चर्चेत आहे. केकेआर संघाचा मालक शाहरुख खानच्या जागी त्याची दोन्ही मुले आर्यन खान आणि सुहाना खान आले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताही होती.
या तिन्ही सेलिब्रिटी मुलांच्या फोटोंनी ट्विटरवर वर्चस्व गाजवले आहे. सुहाना आणि आर्यनबद्दल सर्वांना माहिती आहे पण जुही चावलाची मुलगी लाइमलाइटपासून दूर राहते. आयपीएल लिलावादरम्यान बसलेली दिसलेली जुही चावलाची मुलगी कोण आहे याची सर्वांना उत्सुकता होती. जुही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री खूप घट्ट आहे. त्याच वेळी त्यांच्या मुलांमध्येही चांगले नाते निर्माण होते. जुही चावलाने एक फोटो शेअर केला असून त्यात सुहाना खान, आर्यन खान आणि जान्हवी मेहता बसले दिसत आहेत.
https://twitter.com/iam_juhi/status/1492469223339139072?s=20&t=XHENlr5QPPzFWgGlFhhptA
जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेस मन जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन आहे. दोघेही प्रसिद्धीव कॅमेऱ्यांपासून दूर राहतात. मात्र, आता हळुहळू त्याचे सार्वजनिक स्वरूप दिसू लागले आहे. गेल्या वर्षीही आयपीएल लिलावा दरम्यान जान्हवी मेहताचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. जान्हवी मेहताने परदेशातून शिक्षण घेतले आहे. त्याने 2019 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. जुही चावलाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या मुलीच्या लंडनमधील पदवीदान समारंभाचा फोटो शेअर केला आहे. मात्र तिच्या आईप्रमाणे जान्हवीला चित्रपटांमध्ये काम करण्यात रस नाही. तिला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे आणि तिला लेखक व्हायचे आहे.