मुंबई – अखेर कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आयपीएल २०२१ ही स्पर्धा रद्द करण्याची घोषणा बीसीसीआयने आज केली. आम्हाला खेळाडूंची आणि त्याच बरोबर आयपीएलचे व्यवस्थापन करणाऱ्या स्टाफच्या तब्येतीची/सुरक्षिततेची काळजी असल्याने आम्ही ही स्पर्धा रद्द करत आहोत अशी घोषणा आयपीएलच्या वतीने आज करण्यात आली.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा सामना काल रद्द करण्यात आला होता. कारण कोलकात्ता नाईट रायडर्स संघातील वरूण चक्रवर्ती व संदीप वॉरियर्स हे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ही स्पर्धाच रद्द करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. आता ही स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा झाल्याने क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा होणार असली तरी खेळाडूं आणि स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या स्टाफला मात्र कोवीडपासुन सुरक्षितता मिळणार आहे हे निश्चित.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानुळे आयपीएलचे आगामी सामने आता होणार आहे. ते तात्पूरते रद्द करण्यात आले आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या न्यूज एजन्सीने केले आहे.
आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यात येत असल्याची माहीती आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली असली तरी पुन्हा आयोजन कसे होईल, केव्हा होईल? याबाबत संदिग्धता असल्याने या सिझनपुरती आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचेच मानले जाते आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1389487813192818689?s=20