नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या २०२१ लिलावात दक्षिण अफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने विश्वविक्रम केला आहे. जगातील सर्वात महागडी बोली या खेळाडूच्या नावावर लागली आहे. त्याला तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लागली आहे. ही आजवरची सर्वाधिक बोली आहे.
लिलावात एकूण १११४ पैकी केवळ २९२ खेळाडूंचा सहभाग आहे. आठ संघांना एकूण ६१ खेळाडूंची आवश्यकता आहे. आयपीएलच्या लिलावासाठी भारतीय अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग, मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव, ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांना जास्त मूल्य ( बेस प्राईज ) २ कोटी रुपये देण्यात आले होते. याशिवाय भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा २० लाख रुपयांच्या सर्वात कमी मूल्यमध्ये समावेश आहे.
https://twitter.com/IPL/status/1362350453946675203