चेन्नई – इंडियन प्रिमिअर लिगच्या यंदाच्या हंगामाची लिलाव प्रक्रिया सध्या सुरू आहे. बघा कोणत्या खेळाडूला किती बोली लागली….
-
आरसीबीने रजत पाटीदारवर लावली २० लाखांची बोली
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने भारतीय खेळाडू सचिन बेबीला खरेदी केले २० लाख रुपयात
-
मुंबई इंडियन्सने अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावला यास २ कोटी ४० लाख रुपयात विकत घेतले. गेल्यावेळी तो चेन्नई सुपर किंग्ज मध्ये होता.
-
दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज उमेश यादवला एक कोटीत खरेदी केले.
Did you folks see this coming? ??
Massive buy from @PunjabKingsIPL ?? @Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/MUTQcevC53— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
-
मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईल याला ५ कोटीत खरेदी केले.
-
पंजाब किंग्जने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याला १४ कोटी रुपयात खरेदी केले. तो अद्याप आयपीएल खेळलेला नाही.
-
राजस्थान रॉयल्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला एक कोटी रुपयात खरेदी केले.
-
मुंबई इंडियन्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेला ३ कोटी २० लाख रुपयांमध्ये विकत घेतले.
.@PunjabKingsIPL acquire @dmalan29 for INR 1.5 Cr. @Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/jyirofogyl
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
-
राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस याला तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले. आजवरची सर्वाधिक बोली
-
पंजाब किंग्जने इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मालन याला १ कोटी ५० लाख रुपयात खरेदी केले. टी२०च्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मालन हा प्रथम क्रमांकावर आहे.
-
कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला ३ कोटी २० लाख रुपयात खरेदी केले.
-
चेन्नई सुपर किंग्जने इंग्लंडचा स्पिन अष्टपैलू मोईन अलीला सात कोटी रुपयांत विकत घेतले.