नवी दिल्ली – आयपीएल २०२१ चे लिलाव आज होत असून यावेळी या लिलावासाठी एकूण २९२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, त्यात अनेक प्रसिद्ध देशी-विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात विदेशी खेळाडूंची संख्या १२८ आहे.
आता आठ फ्रँचायझीसह एकूण २२ विदेशी खेळाडूंसाठी हा स्लॉट रिक्त असला तरी अनेक टिम विदेशी खेळाडूंवर जोरदार बोली लावण्याची शक्यता आहे. या खेळाडूंमध्ये अशी ५ मोठी नावे आहेत, जी प्रत्येक टिमद्वारे प्रथम पाहिली जातील, तसेच सर्वात महागड्या बोलीत कोणाची विक्री होते हे पाहणे सर्वांकरिता उत्सुकतेचे ठरणार आहे. कोण आहेत हे ५ विदेशी खेळाडू जाणून घेऊ…
ग्लेन मॅक्सवेल- आयपीएल २०२१ च्या लिलावात मॅक्सवेल मोठ्या विदेशी खेळाडूंच्या यादीत आहे. अनेक फ्रँचायझी यावर मोठ्या बोली लावतील, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वेळी शेवटचे काही हंगाम मॅक्सवेलसाठी चांगले नव्हते आणि मागील सत्रात १३ सामन्यांत फक्त १०८ धावा करणारा खेळाडू होता.
स्टीव्ह स्मिथ- आयपीएल २०२० मध्ये स्मिथला तो राजस्थान रॉयल्सचा खेळाडू असताना सर्वांनाच धक्का बसला. मागील हंगामात स्मिथने १३ सामन्यांत ३११ धावा केल्या, मात्र त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे अपेक्षित आहे की, संघ त्याच्यावर जीवावर बाजी मारू शकणार आहेत.
शाकिब अल हसन- बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू साकिब अल हसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला असून या लिलावामध्ये त्याची मागणी होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे तो संघाला जबरदस्त संतुलन देतो एका बाजूने खरे आहे. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये शाकिबला जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मानले जाते.
ख्रिस मॉरिस – दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसला मागील वर्षी आरसीबीने १० कोटीमध्ये विकत घेतले होते, परंतु गेल्या हंगामात त्याने ९ सामन्यांत १२ बळी घेतले आणि ३४ धावा केल्या. ज्यानंतर त्याला आरसीबीने सोडले. ख्रिस हा विकेट घेणारा गोलंदाज तसेच वादळी फलंदाज आहे. अशा खेळाडूंची अनेक संघालाही गरज आहे. आता त्याला कोणत्या संघात स्थान मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काइली जेमीसन- न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कायलीला गौतम गंभीरने आयपीएलचा पुढील चांगला खेळाडू म्हणून निवडले होते. ७५ लाखांच्या बेस प्राइससह तो आयपीएलच्या लिलावात प्रथमच सामील होत आहे. या युवा खेळाडूने आंतरराष्ट्रीय सर्किटवर केलेल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. या लिलावात प्रत्येक संघाच्या हिट यादीमध्ये तो असण्याची शक्यता आहे.