मुंबई – वेगवेगळ्या फोन कंपन्या विविध प्रकारचे स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. तसेच अॅपलने 14 सप्टेंबरला आयफोन 13 हा स्मार्टफोन सीरिज लॉन्च केली आहे. 17 सप्टेंबरला त्याची प्री-सेल चीनमध्ये झाली. मात्र चीनच्या शॉपिंग वेबसाइट टी मॉलवर आयफोन 13 चे गुलाबी मॉडेल अवघ्या 3 मिनिटांत विक्री झाले.
एका अहवालानुसार, 16 सप्टेंबरपर्यंत 3 मिलियनहून अधिक लोकांनी Tmall वर आयफोन 13 मालिकेसाठी भेटी बुक केल्या होत्या. आयफोन 13 आणि आयफोन 13 – मिनीचे एकूण पाच रंग पर्यायांमध्ये देण्यात येतात. यात ब्लू, पिंक, मिडनाइट, रेड आणि स्टारलाईट उपलब्ध आहे. तसेच आयफोन 13 प्रो मॉडेल गोल्ड, ग्रेफाइट, सिएरा ब्लू आणि सिल्व्हर शेड्समध्ये आहेत. आयफोन 13 रिलीज झाल्यापासून, गुलाबी मॉडेल देखील इंटरनेटवर खूप शोधले जात आहे.
गुलाबी रंग खरेदी करणारे बहुतेक ग्राहक महिला आणि युवक आहेत. आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनी स्मार्टफोन 5.4-इंच डिस्प्लेसह देण्यात येतो, तर आयफोन 13 फोन 6.1-इंच डिस्प्लेसह येतो. OLED पॅनलसह येणाऱ्या या फोनमध्ये अॅल्युमिनियम फ्रेम उपलब्ध आहे. या कंपनीने 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी वेरिएंटमध्ये स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये अॅपलचा लेटेस्ट ए 15 बायोनिक चिपसेट देण्यात येत आहे.
फोटोग्राफीसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 12MP प्लस 12MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. भारतात आयफोन 13 बेस 128 जीबी स्टोरेजची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर आयफोन 13 256GB आणि 512GB मॉडेलची किंमत अनुक्रमे 89,900 आणि 1,09,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे, आयफोन 13 मिनीच्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 69,900 रुपये आहे. तसेच त्याच्या 256GB स्टोरेजची किंमत 79,900 रुपये आणि 512GB स्टोरेजची किंमत 99,900 रुपये आहे.