पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधुनिक काळात वेगवेगळ्या स्मार्टफोन उत्पादन करणार्या कंपन्या नवनवीन मॉडेल बाजारात आणत असतात. कालानुरुप काही जुनी मॉडेल मागे पडतात, किंवा बंद होतात. नवीन मॉडेल येत असल्याने काही कंपन्यांनी आपल्या जुने मॉडेल कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपल कंपनीनेही आता त्यांचे स्मार्ट फोनचे तीन मॉडेल बंद करण्याचे निश्चित केले आहे.
आपण जर आयफोन यूजर असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची व धक्कादायक बातमी आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, टेक्नॉलॉजीतील दिग्गज अॅपल आपले लाखो जुने आयफोन मॉडेल्स बंद करणार आहे. त्यात कंपनी विशेषतः तीन मॉडेल्स बंद करणार आहे. सध्या लाखो ग्राहक हे मॉडेल्स वापरत आहेत. यामध्ये लोकप्रिय iPhone SE चाही समावेश आहे. हे तीन मॉडेल्स कधी बंद होणार ते जाणून घेऊ या …
या संदर्भात असे म्हटले जात आहे की, iOS 16 रिलीज झाल्यानंतर कंपनी ३ iPhones कायमचे बंद करेल. त्यात iPhone SE, iPhone 6s आणि iPhone 6s Plus या मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या व्हिंटेज उत्पादनांची यादी अॅपडेट करणार आहे. हे सर्व आयफोन वापरकर्त्यांना माहित असले पाहिजे. अनेक आयफोन मॉडेल्स आधीच “व्हिंटेज” आणि “अप्रचलित” घोषित केले गेले आहेत. MacRumors ने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, आता या यादीत iPhone 6 Plusचा देखील समावेश करण्यात आला आहे. अॅपलने iPhone 6 आणि iPhone 6 Plus हे मॉडेल 2015 मध्ये लाँच केले. लाखो ग्राहकांनी हे मॉडेल्स घेतले आहेत. आयफोन 6 सध्या 2023 पर्यंत संरक्षित आहे.
एकदा आयफोनचा ‘व्हिंटेज’ यादीत समावेश झाला की, त्या मॉडेलचे स्पेअर पार्ट मिळवणे आणि दुरुस्ती करणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत, डिव्हाइसमध्ये काही समस्या असल्यास, ते निराकरण करण्याच्या बाबतीत खूप मर्यादा येतात. ‘व्हिंटेज’ कालावधी दोन वर्षांचा असतो, त्यानंतर कंपनी सदर फोन उत्पादन ‘अप्रचलित’ म्हणून घोषित करते. यानंतर कंपनीने अशा उत्पादनांसाठी सर्व हार्डवेअर सेवा बंद केल्याने समस्या वाढतात.
iPhone 6 Plus आणि iPhone 6 आता नवीनतम iOS अपडेट प्राप्त करण्यासाठी खूप जुने आहेत. मात्र अॅपलचे iOS 15 फक्त iPhone 6S किंवा त्यानंतरच्या एडीशनमध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकते. त्यामुळे यापैकी लाखो युजर्स वापरणाऱ्या जुने मॉडेल्स आता टप्प्याटप्प्याने बंद केल्या जात आहेत. अॅपलने दोन वर्षांपूर्वी iOS 13 च्या रिलीझसह iPhone 6 साठी प्रयत्न केले मात्र कंपनीसाठी एक मोठी समस्या ही आहे की, केवळ नवीन वैशिष्ट्ये नसल्यामुळेच नाही, तर आपल्याला आवश्यक सुरक्षा अपडेट्स मिळत नाहीत, त्यामुळे फोन हॅक होण्याचा धोका वाढतो.