मुंबई – गेल्या दशकभरात ओळखले जाणारे आभासी चलन म्हणजेच क्रिप्टोकरंसीद्वारे पैशांचा व्यवहार वाढला आहे. क्रिप्टोकरंसी काही तासातच तुम्हाला मालामाल किंवा कंगाल करू शकते. अचानक आलेली उसळी किंवा कोसळण्यासाठी क्रिप्टोकरंसी (मायक्रो टोकन) ओळखली जाते. क्रिप्टोकरंसी फक्त एक किंवा दोन दिवसात हजारो पटीने परतफेड करते.
एका क्रिप्टोकरंसीमध्ये फक्त २४ तासांत २,३५००० टक्के अधिक उसळी येऊ शकते. म्हणजेच जर कोणी २४ तासांपूर्वी एक हजार रुपये लावले असतील. तर सध्या त्याची किंमत २.३७ कोटी रुपये असेल. परंतु सगळेच गुंतवणूकदार अशा मायक्रो टोकनद्वारे पैसे जमवू शकत नाहीत.
स्क्विड गेम्स बेस्ट SQUID (स्क्विड) आणि Kokoswap (कोको) या क्रिप्टोकरंसीजमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांत उसळी आल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासात इथेरियम मेटा या क्रिप्टोकरंसीने २,३५००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, क्वॉइनमार्केटकॅप च्या डाटाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, इथेरियम मेटा या क्रिप्टोकरंसीमध्ये २४ तासात २.३५ लाख टक्क्यांहून अधिक उसळी आली आहे.
डिजिटल टोकन इथेरियम मेटा गेल्या २४ तासात ०.०००००००५०३३ डॉलरवरून ०.०००११९४ डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यानंतर ती क्रिप्टोकरंसी ०.००००६४४९ डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. या क्रिप्टोकरंसीचे टोटल मार्केट कॅप ८५ लाख डॉलरपेक्षा अधिकच आहे. गेल्या २४ तासात तिच्या ट्रेडेड व्हॉल्यूममध्ये १६० टक्क्यांहून अधिक उसळी आली आहे. या क्रिप्टोकरंसीची टोटल सप्लाय ९९,०००,०००,००० आहे. या टोकनची ही कमाल मर्यादा आहे. डाटा असे सांगतो की ५०.०१ लाख इथेरियम मेटा टोकन्स सर्क्युलेशनमध्ये होते. क्रिप्टोकरंसीच्या जगात इथेरियम मेटा नवे नाव नसून, ते गेल्या तीन वर्षांपासून आहे.
क्रिप्टोकरंसी म्हणजे काय
क्रिप्टोकरंसी म्हणजे आभासी चलन. या संकल्पनेची ओळख होऊन दहा-बारा वर्षे झाली आहेत. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरता येते. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने बिटकॉइनची संकल्पना निर्माण केली होती. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून बिटकॉइन अस्तित्वात आले होते.
त्यानंतर जगभरात गेल्या काही वर्षात शेकडो प्रकारच्या क्रिप्टोकरंसी निर्माण झाल्या. या आभासी चलनाद्वारे करण्यात आलेले व्यवहार गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारासाठी जगातील कोणत्याही बँकांशी संलग्न राहण्याची गरज नाही. कोणत्याही कंपनीची या आभासी चलनावर मक्तेदारी नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने त्यावर कोणताही कर लागू होत नाही. त्यामुळे गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढला असून तो अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचला आहे.