मेष – बरेचदा फायद्या-तोट्याचा फारसा विचार न करता पटकन निर्णय घेता. आपला शब्द दिला गेला आहे तो पाळला पाहिजे असा स्वभाव असल्याने गुंतवणुकीत म्हणावा तेवढा फायदा होईलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा…….
वृषभ – दीर्घकालीन फायदा झाला पाहिजे त्यामध्ये कोणत्याही तांत्रिक अथवा छोट्यामोठ्या अडचणी येऊ नये असा आपला स्वभाव असल्याने शक्यतो अल्प मुदतीची गुंतवणुक टाळावी. शब्दच्छल करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नये…..
मिथुन – फायद्या-तोट्याचा अतिविचार करण्यात वेळ दवडला जातो. त्यामुळे फायद्याच्या गुंतवणुकीची नामी संधी आपण अनेकदा गमावता. काही बाबी मार्केट रिस्कवर सोडून आपण गुंतवणूक करावी…….
कर्क – एकाच विषयावर अनेक व्यक्तींचा सल्ला घेतल्याने निर्णयात गोंधळ उडण्याची शक्यता अधिक असते. आपला विश्वास असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींचा सल्ला घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी साधावी…..
सिंह – बदलत्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करूनच आपण गुंतवणूक करावी. कोणत्याही क्षेत्रातील आपल्या व्यक्तिगत अभ्यासाला व आकलनाला मर्यादा असतात. हे एकदम मान्य केले की योग्य व्यक्तीचा सल्ला आपोआप घेतला जातो. तसा घेऊनच गुंतवणूक करा……
कन्या – संपुर्णपणे फक्त आपलाच फायदा होईल तशाच क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची या अट्टाहासामुळे अनेकदा गुंतवणुकीची संधी हुकते. सल्लागाराच्या सल्ला देण्याच्या मर्यादा संपायच्या आत निर्णय घ्यावा. अति प्रश्न विचारणे टाळावे…….
तूळ – अति विश्वास टाकल्याने बरेचदा आपला तोटा होतो. ऐकावे जनाचे करावे मनाचे. केवळ कुठेतरी गुंतवणूक करायची म्हणून करू नये. त्यापेक्षा न केलेली बरी……
वृश्चिक – गुंतवणुकीमध्ये फायदा बरोबर तोटाही होतो हे दोन्हीचे प्रमाण कमी जास्त असू शकते. हे स्वतःला समजून सांगावे. फायदा झाला त्याच ठिकाणी परत मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करावr तर तोटा झाल्यास परत तिथे गुंतवणूक करायची नाही असे ही नसते. त्याचा समतोल साधावा..
धनु – त्या-त्या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी तेवढ्या रकमेची तरतूद करून ठेवावी. कमी रकमेमध्ये अधिक फायदे किंवा परतावा मिळण्याची अपेक्षा करू नये. केवळ ओळख आहे, ते आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाहीत, असा समज करून घेऊ नये…
मकर – ज्या मुदतीसाठी गुंतवणूक केली आहे ती पूर्ण करावी. मुदतीमध्ये धरसोड केल्यास पूर्ण फायदा मिळणार नाही…
कुंभ – योग्य वेळी गुंतवणूक करावी. HIT THE IRON WHEN IT IS HOT हे सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे…
मीन – गुंतवणुकीसाठी योग्य संधीची वाट बघा. आता आपल्याकडे पैसे आहेत, आत्ताच कुठे तरी इन्व्हेस्ट करू अशा विचारांमुळे फायदा ऐवजी तोटा होतो.. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ साधा…
(टीप – वाचकांनी त्यांच्या राशीप्रमाणे कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी, याबाबतीतले मार्गदर्शन राशी सोबत नक्षत्र व कुंडली, त्याचप्रमाणे ग्रहांच्या अंतर्दशा व महादशा पाहून व्यक्तिगतरित्या केले जाते)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!