गुंतवणूकीचे स्मार्ट नियोजन
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला बहुतांश कंपन्या व व्यवसाय पुढील वर्षाबाबत विचार करतात आणि त्यानुसार नियोजन करतात. तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक संकल्प करणे चुकवले असेल, तर या आर्थिक वर्षाची सुरुवात ही योजना तयार करण्याची आणि वर्षासाठी तुमची गुंतवणूक मिळवण्याची आणखी एक संधी आहे. गुंतवणूकीचे स्मार्ट नियोजन कसे करता येईल याबद्दल माहिती देताहेत ट्रेडस्मार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंघानिया.
बजेट तयार करा:
शिस्तबद्धता हा कोणत्याही यशस्वी गुंतवणूक प्रवासाचा आधारस्तंभ आहे. यामागील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे बजेट तयार करणे. तुमचे आर्थिक यश योग्यरित्या तयार केलेल्या बजेटवर अवलंबून असते. बजेट तुम्हाला जमा-खर्च योग्यरित्या समजण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही नको असलेल्या किंवा टाळता येऊ शकणा-या खर्चांबाबत काळजी घेऊ शकाल. यामुळे अतिरिक्त शिल्लक जमा होईल आणि या शिल्लक रक्कमेचा गुंतवणूक करत योग्यरित्या वापर होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात उत्तम परतावे मिळतील.
उत्पन्न – बचत = खर्च हे समीकरण लक्षात ठेवा.
अधिक जमासाठी नियोजन करा:
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला कर्मचा-यांना बोनस देखील मिळतो. या अतिरिक्त जमा रक्कमेच्या सानुकूल वापराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. नको असलेले किंवा थकित कर्ज फेडण्याला प्रथम प्राधान्य द्यावे. गुड डेब्ट्स (चांगली कर्जे) घर किंवा शिक्षण अशा मालमत्ता निर्माण करण्यास मदत करतात. पर्यायी असू शकणा-या वस्तूंवर खर्च केल्याने थकित कर्ज निर्माण होते. या कर्जाची परतफेड करण्याला प्राधान्य द्या. शिल्लक राहिलेली रक्कम एकरकमी किंवा ठराविक कालावधीत गुंतवली जाऊ शकते. तुमच्या जोखमीच्या क्षमतेवर आधारित इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इक्विटी हा एक चांगला पर्याय आहे.
कर परिणाम:
कर नियोजन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. सामान्यत: अगदी शेवटच्या क्षणी कर नियोजन केले जाते, जेथे कर बचत करण्यासाठी गुंतवणूक करण्याची घाई केली जाते. अगोदरच नियोजन केले तर कर कमी होण्यास मदत होण्यासोबत भविष्यात सर्वोत्तम आर्थिक स्थिती सुनिश्चित करण्यामध्ये देखील मदत होऊ शकते. म्युच्युअल फंड्सच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्सचे (ईएलएसएस) इक्विटी परताव्यांमधील सहभागांचे दुहेरी फायदे आहेत, तसेच कर बचत होण्यामध्ये देखील मदत होते.
आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), जी सेवानिवृत्ती निधी तयार करण्यास मदत करू शकते. आणखी एक फायदा म्हणजे कलम ८०क अंतर्गत १.५० लाख रूपये व त्यावरील कपातीवर ५०,००० रूपयांची कपात उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजकासोबत बसून सानकूल कर पोर्टफोलिओ निर्माण करण्याची खात्री घ्या.
पुरेशा संरक्षणाची खात्री घ्या:
बदलत्या आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसारख्या इतर घटकांमुळे तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा विमा आहे का याचे मूल्यांकन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी घेतली जाईल याबाबत खात्री करण्यासाठी टर्म लाइफ कव्हर आवश्यक आहे. पुरेसा विमा निश्चित करण्याचे विविध मार्ग आहेत. ब-याच विमा कंपन्यांकडे कॅल्क्युलेटर असतात, जे तुम्हाला किती विमा असावा हे जाणून घेण्यास मदत करतात. पण सामान्य नियमानुसार तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट विमा असावा. आरोग्य विमा चुकवू नका. वैद्यकीय उपचारांच्या वाढत्या किंमतीमुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला वैद्यकीय विम्याचे संरक्षण मिळणे अत्यावश्यक बनले आहे. किमान १० लाख रूपयांचा फॅमिली फ्लोटर पहा.
ध्येयांचे नियोजन करा:
तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येयांचे पुनरावलोकन व मूल्यांकन करत असल्याची खात्री घ्या. ही तुमची मुले, सुट्टीमधील धमाल, घरखरेदी आणि निवृत्तीनंतरचे जीवन सुनिश्चित करण्यासाठी उत्तम शिकवण असू शकते. तुमची ध्येये स्मार्ट – स्पेसिफिक (विशिष्ट), मेजरेबल (मापनीय), अचीव्हेबल (संपादित करता येणारी), रिअॅलिस्टिक (वास्तववादी) आणि टाइमली (वेळेवर) असली पाहिजे.
समजा की तुमचे ध्येय घर खरेदी करण्याचे आहे.
स्पेसिफिक – मला घर खरेदी करायचे आहे
मेजरेबल – मला – इतक्या पैशांची गरज लागेल.
अचीव्हेबल – हे ध्येय संपादित करण्यासाठी माझ्याकडे संसाधने आहेत का?
रिअॅलिस्टिक – ५ बीएचके सदनिका खरेदी करणे वास्तविक असू शकत नाही, पण २ बीएचके असू शकते.
टाइमली – हे ओपन एंडेड असू शकत नाही, एखाद्या व्यक्तीला काम करण्यासाठी विशिष्ट कालावधीची गरज असू शकते, उदाहरणार्थ ३ वर्षे.
तुम्ही गुंतवणूक करू शकाल असे खाते नसेल तर आजच खाते सुरू करा. तुम्ही सतत तुमच्या गुंतवणूकांवर देखरेख ठेवण्याची आणि दीर्घकाळापर्यंत त्यांचा लाभ घेण्यासाठी शिस्तबद्धता राखत असल्याची खात्री घ्या.
investment smart planning expert article