इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साधारणतः 55 ते 60 वयानंतर कोणत्याही व्यक्तीला आपले जीवन शांततेत जगायचे असते. त्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करावे लागते. सरकारी नोकरीत असलेल्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, मात्र खासगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना अशी कोणतीही सुविधा मिळत नाही. आपण जर निवृत्तीनंतरचे जीवन सुकर करण्यासाठी नियमित उत्पन्नाच्या शोधात असाल आणि गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर नियमित उत्पन्नासाठी सर्वोत्तम 4 पर्याय असून येथे पैसे गुंतवले तर दर महिन्याला खात्यात विशिष्ठ रक्कम जमा होईल.
गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती असते. त्याकरिता बँक FD, पोस्ट ऑफिस आणि NBFC मध्ये मुदत ठेव करू शकता. बँका आणि पोस्ट ऑफिसच्या तुलनेत एनबीएफसी आणि कंपन्या जास्त परतावा देतात. ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त सवलत मिळते. तथापि, या मुदत ठेवींमध्ये सरकारी धोरणातील अचानक बदलांमुळे किंवा कंपनीच्या बाह्य घटकांमुळे डिफॉल्ट होण्याचा काही धोका असतो. सध्या FD वर वार्षिक 5.30 टक्के व्याज आहे. गुंतवणूकदारांना खात्रीशीर मासिक उत्पन्नाचा पर्याय देऊन, एफडीमधून मिळणारे व्याज नियमितपणे काढले जाऊ शकते.
MIS खात्यात हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. तो कोणत्याही धोका किंवा जोखमीशिवाय नागरिकांसाठी अधिक चांगला सिद्ध होऊ शकतो. या योजनेत एकरकमी पैसे जमा करावे लागतील म्हणजेच MIS खात्यात एकदाच गुंतवणूक करा, त्यानंतर तुम्ही दरमहा कमाई करू शकता. पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेवर बाजारातील चढउतारांचा कोणताही परिणाम होत नाही. पोस्ट ऑफिस MIS वर सध्या 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.
मासिक उत्पन्न योजना (एमआयपी) हे म्युच्युअल फंड आहेत जे प्रामुख्याने निश्चित उत्पन्न आणि इक्विटी-संबंधित बाबींमध्ये लहान भाग गुंतवतात. तसेच फंड हाऊस नियमितपणे त्यांच्या गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्नासह पैसे देतात. मात्र रक्कम निश्चित नाही आणि फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असते.
दीर्घकालीन सरकारी रोखे हे नियमित उत्पन्न मिळविण्याचा एक पर्याय आहे. मॅच्युरिटी कालावधी बराच मोठा असला तरी, गुंतवणूकदार त्याचा वापर करून वर्षभर उत्पन्न मिळवू शकतात. त्यामुळे खासगी ऐवजी सरकारी बॉण्ड मध्ये गुंतवणूक करणे केव्हाही फायदेशीर ठरते असे म्हटले जाते. सहाजिकच सर्वसामान्य नागरिक किंवा ग्राहक यांनी सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते.