मुंबई – शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत, गुंतवणूकदार त्यांचे शेअर खरेदी करून एका वर्षात श्रीमंत झाले. कारण शेअर बाजार हा एक प्रकारे सट्टा किंवा नशीबाचा खेळ म्हटला जातो. त्यामध्ये कधी खूप धनलाभ होतो, तर कधी कफल्लक देखील होण्याची वेळ येऊ शकते. तरीही अनेक जण यामध्ये पैसे लावून आपले भाग्य आजमावतात.यंदा मात्र गुंतवणूकदारांसाठी दिवाळी चांगली जाणार आहे. कारण शेअर बाजारात चांगले वातावरण आहे
वर्षभरात 4,O97 टक्के परतावा
मागील वर्षी कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले. मात्र या वर्षी 2021 मध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचे भविष्य बदलले आहे. यापैकी काही पेनी स्टॉक देखील आहेत. त्यातील एक पेनी स्टॉक आहे, तो म्हणजे गीता रिन्युएबल एनर्जीचा होय. या कंपनीच्या शेअरने एका वर्षात 4,O97 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 6.O7 रुपये होती ती आता 255 रुपयांच्या पातळीवर आहे.
स्टॉकची किंमत
या वर्षी 26 ऑक्टोबर रोजी स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक 328.35 रुपये गाठला होता. मात्र, तेव्हापासून त्यात नफा वसुली होताना दिसत आहे. सध्या शेअरचा भाव 255 रुपयांच्या पातळीवर आहे. याशिवाय कंपनीचे बाजार भांडवल 104.78 कोटी रुपये आहे.
ही रक्कम वाढली
गीता रिन्युएबल एनर्जीच्या स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी एक लाख रुपयांची पैज लावली असती तर आज ही रक्कम सुमारे 42 लाख रुपये झाली असती. गीता रिन्युएबल एनर्जीच्या जून तिमाहीच्या निकालांवर नजर टाकल्यास, कंपनीचा महसूल 0.6 कोटी रुपये आहे आणि कंपनीचा नफा 3.62 कोटी रुपये आहे.
(महत्त्वाची सूचना- पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे. अशा परिस्थितीत, चांगले संशोधन केल्यानंतर, जोखीम समजून घेणे आणि पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवणे महत्वाचे आहे.)