पुणे – शेअर बाजारात योग्य वेळी केलेली छोटी-मोठी गुंतवणूक आपल्याला श्रीमंत बनवू शकते. रामा फॉस्फेट ही अशीच एक मोठी कंपनी असून तिने गुंतवणूकदारांचे भविष्य बदलण्याचे काम केले आहे. खत बनवणाऱ्या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त मोठा परतावा दिला आहे.
रामा फॉस्फेट कंपनीचे दि. 20 सप्टेंबर 2001 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) समभाग 1.55 रुपयांवर बंद झाले तर दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीचे समभाग इंट्राडेमध्ये 306 रुपयांच्या उच्चांकावर होते. तसेच कंपनीच्या समभागांनी गेल्या 20 वर्षांत 19,641 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे सुमारे 197 पट वाढले आहेत. गेल्या 5 वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 59.95 रुपयांवरून 306 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत स्टॉकने सुमारे 410 टक्के परतावा दिला आहे. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात हा स्टॉक 42.15 रुपयांवरून 306 रुपयांवर पोहोचला आहे.
7 ऑक्टोबर 2011 रोजी बीएसईवर हा स्टॉक 42.15 रुपयांच्या पातळीवर होता. या शेअरने गेल्या 10 वर्षात सुमारे 625 टक्के परतावा दिला आहे. 20 वर्षांत, स्टॉक 1.55 रुपयांच्या पातळीवरून 306 रुपयांवर पोहोचला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज 5.10 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी, जर 10 वर्षांपूर्वी त्याने स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 7.25 लाख रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तो 1.97 कोटी रुपयांचा मालक झाला असता. अर्थात गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक ठेवली असती तरच त्याला हा लाभ मिळाला असता.