इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपट असो की मालिका नायक – नायिकेच्या रोमान्सशिवाय कोणताही सीन पूर्ण होत नाही. रोमान्स म्हटला की त्यात इंटीमेंट सीन देखील असतात. अनेकदा अभिनेते आणि अभिनेत्री चित्रीकरण करताना आपल्या अभिनयामध्ये एवढे हरवून जातात की दिग्दर्शकाने कधी कट म्हटलं याचं त्यांना भानही राहत नाही. असच काहीसं ‘लव्ह लाईफ अँड स्क्रू अप्स’च्या सेटवर घडलं.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लव्ह लाईफ अँड स्क्रू अप्स’ ही वेबसिरीज सुरू होणार आहे. या सिरीजच्या सेटवर एका इंटिमेंट सीनचं चित्रीकरण सुरू होतं. अभिनेत्री सोनाली राऊत आणि युवराज पराशर यांच्यावर हा सीन चित्रीत केला जात होता. सुरुवातीला सोनाली आणि युवराज दोघेही काहीसे नर्व्हस होते. दोघांनाही हा सीन शॉवरखाली चित्रित करायचा होता. त्यामुळे ते दोघेही थोडे अवघडले होते. हे दिग्दर्शकांच्या देखील लक्षात आलं.
एकाच शॉटमध्ये संपूर्ण सीन चित्रित करण्याचे त्यांनी ठरवले, दिग्दर्शकाने देखील ते मान्य केले. जोपर्यंत दिग्दर्शक कट म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांनी अभिनय थांबवता कामा नये, असे त्यांना सांगितले. कॅमेरा रोल झाला आणि शॉवर सुरू झाला. त्यानंतर सोनाली आणि युवराज चित्रीकरणात एवढे हरवले की, त्यांना भानच राहिले नाही. दिग्दर्शकांनी कॅमेरामनला शूटिंग सुरू ठेवण्यास सांगितले कारण त्यांना सीनमध्ये हवे असलेले फुटेज मिळत होते.
जेव्हा दिग्दर्शकांना वाटले की, त्यांना पुरेसे फुटेज मिळाले आहे. तेव्हा त्यांनी दोन्ही कलाकारांकडे जाऊन त्यांच्या कानात कट म्हटले. सोनाली आणि युवराज या शब्दानंतर भानावर आले. हा सीन शूट करताना त्यांना आपण काय करतोय याचे भान राहिले नव्हते. ही सिरीज पुढील वर्षी ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामध्ये झीनत अमानही असेल.
https://twitter.com/Realsonaliraut9/status/1503291987562094595?s=20&t=ds3qCmrClGdeN_yDABwE9Q
Intimate Scene Shooting Hero and Heroine Director
Entertainment Actress Sonali Raut Actor Yuvraaj Parashar OTT