मुंबई – सध्याचे युग हे इंटरनेटचे आहे. इंटरनेटशिवाय जगणेही अनेकांना मुश्कील झाले आहे. मात्र, सध्या ज्या कंपनीची आपण सेवा वापरतो ती योग्य किंवा दर्जेदार नसेल तर काय करावे, असा प्रश्न अनेक ग्राहकांना असतो. त्याचे उत्तर आता मिळाले आहे. नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (एनआयएक्सआय)कडे तुम्ही बिनधास्त तक्रार करु शकता.
एनआयएक्सआय म्हणजेच नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया’ च्या वतीने ग्राहकांच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्राची स्थापना केली आहे. ग्राहकांना समर्पित या उपक्रमामुळे इंटरनेट व्यवहाराविषयी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ग्राहकांबरोबर संवाद साधणे सुकर जाणार आहे. या सेवा केंद्रातील टीम इंटरनेटच्या सर्व ऑपरेशन्सविषयी ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दिवसाचे चोवीस तास उपलब्ध असणार आहे.
एनआयएक्सआय तीन व्यवसायांसाठी कार्यरत आहे. यामध्ये इंटरनेट एक्सचेंज, डॉट इन रजिस्ट्री आणि आयआरआयएनएन यांचा समावेश आहे. या तीनही विभागामार्फत वेगवेगळ्या ग्राहकांशी त्यांचे व्यवहार होत असतात. त्यांच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे तसेच आपल्या ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र स्थापण्यात आले आहे. बऱ्याचदा ग्राहक एनआयएक्सआयच्या दोन वेगवेगळ्या विभागांकडून सेवा घेत असतात. अशावेळी ते दोन्हीकडे आपल्या कामासंदर्भात संपर्क साधत असतात. यामुळे वेळेचा अपव्यय होतो, यावर मात करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने, सुलभतेने सेवा देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
येथे संपर्क साधा
फोन – 011-48202001
ईमेल – [email protected]
एनआयएक्सआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार जैन यावेळी म्हणाले की, भारतीय इंटरनेट समुदायाला चांगली सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, त्यासाठीच या ग्राहक दक्षता विभागाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांना ऑन बोर्डिंगपासून ते बाहेर पडेपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत करणे शक्य होणार आहे. हा उपक्रम ग्राहकांबरोबर सुलभतेने संवाद प्रस्थापित करण्यासाठी उपुयक्त ठरणार असून सेवा अधिक कार्यक्षमतेने देणे शक्य होणार आहे.
निक्सि अर्थात एनआयएक्सआय या संस्थेविषयी
‘नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया’(एनआयएक्सआय) ‘निक्सि’ही संस्था ना नफा तत्वावरील संस्था असून (कंपनी कायदा 2013-कलम 8 ) 2003 पासून कार्यरत आहे. भारतामध्ये इंटरनेटविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच त्यांचा प्रसार करण्यासाठी कार्य करीत आहे. भारतीयांसाठी इंटरनेटसंबंधातील विविध कामे या संस्थेमार्फत केली जातात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.
1. इंटरनेट एक्सचेंजच्या माध्यमातून आयएसपी, डेटा केंद्र आणि सीडीएनमध्ये इंटरनेट डेटाची देवाणघेवाण केली जाते.
2. आयइन देश-कोड डोमेनची नोंदणी, व्यवस्थापन आणि व्यवहार करणे. भारतासाठी भारत आयडीएन डोमेन.
3. आयआरआयएनएन, इंटरनेट कार्य शिष्टाचाराचे व्यवस्थापन आणि संचालन (IPv4/IPv6).