मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  ‘योगाभ्यास’ वर आधारित दोन डिजिटल माहितीपटांचे प्रसारण

by Gautam Sancheti
जून 20, 2021 | 11:22 am
in राष्ट्रीय
0
IMG 20210620 1416049DMK e1624188124616

नवी दिल्ली -सातव्या आंतराष्ट्रीय योग दिन २०२१ निमित्त आयोजित कार्यक्रमांचा  एक भाग म्हणून , राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय  (एनएफएआय) उद्या (२१ जून २०२१) पासून एनएफएआयच्या यूट्यूब वाहिनीवर ‘योग फॉर हेल्थ’ आणि ‘समाधी’ या दोन प्रथितयश  माहितीपट प्रसारित  करेल. हे दोन्ही चित्रपट एनएफएआयने डिजिटल केले आहेत.
ए. भास्कर राव दिग्दर्शित ‘योग फॉर हेल्थ’ हा माहितीपट १९५० मध्ये तयार करण्यात आला आहे.  योगाभ्यासाचे  महत्त्व अधोरेखित करणार्‍या त्यांच्या सुरुवातीच्या कामांपैकी हा माहितीपट आहे. अकार मिनिटांच्या या माहितीपटात योगाच्या पुरातन विज्ञानाची आपल्याला ओळख करुन देण्यात आली असून सामर्थ्य, तग धरण्याची क्षमता आणि मानसिक दक्षता वाढविण्यात साहाय्यकारी  काही विशिष्ट ‘आसने  ’ दाखविली आहेत. मुंबईतील सांताक्रूझ येथे असलेल्या योग संस्थेच्या देखरेखीखाली हा चित्रपट फिल्म्स डिव्हिजन / डॉक्युमेंटरी फिल्म्स ऑफ इंडियाने सादर केला होता.छायाचित्रणकार दारा मिस्त्री यांनी या माहितीपटाचे  छायांकन केले आहे. बार्कले हिल यांनी समालोचन केले असून व्ही. शिराली यांनी संगीत दिले आहे . माहितीपटाचे  संकलन प्रताप परमार यांनी केले आहे तर पी. के. विश्वनाथ या चित्रपटाचे ध्वनी प्रभारी होते.
१९७७ चा चित्रपट ‘समाधी’ हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे माजी संचालक जॉन शंकरमंगलम यांनी तयार केला आहे. २२-मिनिटांचा हा चित्रपट प्रख्यात योग तज्ज्ञ बीकेएस अय्यंगार यांच्या जीवनाचा इतिहास दर्शवितो. या माहितीपटाच्या च्या माध्यमातून, ५९ वर्षीय अयंगार आपल्या  विद्यार्थ्यांना योगासने शिकवत असल्याचे आणि पार्श्वसंगीतात संस्कृत सुभाषिते   वाजत असल्याचे दाखविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि सतारवादक  भास्कर चंदावरकर यांनी या चित्रपटाला  संगीत दिले होते. शांत चिंतन, संगीताची जोड  आणि पवित्र ग्रंथांमधील पठण या वातावरणात  व्यायामाच्या प्रात्यक्षिकांच्या विस्तृत माहितीसह.योग भावना आणि तत्त्वज्ञानाचा मधुर संगम साधल्याबद्दल या चित्रपटाने  २५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट प्रयोगशील चित्रपटासाठी रजत कमळ  पटकावले होते.
दोन्ही डॉक्यु-फिल्म्स उद्यापासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या युट्यूब चॅनेल वर पाहता येतील.   (https://www.youtube.com/channel/UCIRA_1135D2YBUI1S2C8SIg
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयच्या उदघाटन प्रसंगी गर्दी, शहराध्यक्षांसह पदाधिका-यांवर गुन्हे दाखल

Next Post

पुणे विभागातील पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करण्याच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार बदल

सप्टेंबर 16, 2025
Next Post
carona 1

पुणे विभागातील पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011