शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना; या मान्यवरांची झाली निवड

by Gautam Sancheti
जून 16, 2022 | 4:38 pm
in इतर
0
rajya marathi vikas

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी मंचा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कामासाठी समन्वयक / उपसमन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आदेश राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनी काढले आहेत.

परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याद्वारे संवाद वाढून परदेशात मराठी भाषेचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

भारत समन्वयक पदी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभिषेक सूर्यवंशी (अमेरिका), निवेदिता पानवलकर (अमेरिका), शोभा घुले (ऑस्ट्रेलिया), अमित वाईकर (थायलंड), निरंजन गाडगीळ (जपान), राहुल उरुणकर (केनिया), दीपक शिंदे (चीन), सचिन गांजापूरकर (सिंगापूर), मनोज कुलकर्णी (हाँगकाँग), शिल्पा गडमडे-मुळे (जर्मनी), गणेश गिते (आयर्लंड), अमोल सावरकर (स्वित्झर्लंड), प्रवीण कांबळे (युनायटेड किंगडम), मेघना वर्तक (दुबई), दयानंद देशपांडे (न्यूझिलंड), शैलेश असोंदेकर (सौदी अरेबिया), प्रशांत गिरबाने (भारत) यांची उपसमन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे.

परदेशात स्थायिक झालेले मराठी भाषिक तेथे मराठी भाषेच्या संदर्भात विविध उपक्रम, कार्यक्रम करीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. जगातील अनेक देशांतील मराठी भाषिकांसाठी उपक्रम राबविण्याची तरतूद राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेमध्ये आहे. या संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९ मध्ये अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, कलम क्र. १३ मध्ये अन्य राज्यांत व परदेशात असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे आणि कलम क्र. १६ मध्ये स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गांनी संस्थेचा राखीव निधी वाढविणे या उद्दिष्टांचा समावेश आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील कलम क्र. ९, १३ व १६ मध्ये नमूद केल्यानुसार, अमराठी समाजगटांना मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था व रुची निर्माण व्हावी म्हणून विविध साधने विकसित करणे, अन्य राज्यांत व परदेशांत असलेल्या मराठी भाषकांसाठी विविध भाषिक उपक्रम करणे, स्वामित्वधन, देणग्या, शुल्क, विक्री मूल्य इत्यादी मार्गानी संस्थेचा राखीव निधी वाढवणे या उद्दिष्टांना निश्चित दिशा देण्यासाठी, परदेशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी कार्य करणाच्या व्यक्ती, संस्था यांच्या कार्याची शासनस्तरावर दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक / उपसमन्वयक यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या :
विविध देशातील अनिवासी मराठी भाषिक, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, मंडळे यांचा परस्परांबरोबर संपर्क घडवणे, तसेच विविध देशात मराठी भाषेचा प्रचार प्रसार, जतन व संवर्धन यासाठी होणारे उपक्रम, कार्यक्रम याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला सादर करणे.

जगभरातील विविध मराठी मंडळांची सूची तयार करणे, उपलब्ध सूचीत आवश्यक ते बदल करून सूची अद्ययावत करणे व त्याबाबतची माहिती राज्य मराठी विकास संस्थेला पाठविणे. संचालक, राज्य मराठी विकास संस्था व परदेशातील विविध महाराष्ट्र मंडळांचे प्रतिनिधी यांमधील दुवा/समन्वयक या नात्याने त्यांच्या कार्याची माहिती परस्परांना पुरवणे. तसेच मराठी साहित्य, देवनागिरी लिपी या संबंधातील कार्यक्रमांचे वृत्तांकन मिळवून त्यांचे दुवे राज्य मराठी विकास संस्थेपर्यंत पोहोचविणे. राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेत नमूद केलेल्या कलम क्र. ९ व १३ मध्ये नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संस्थेशी चर्चा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.

तसेच, कलम क्र. १६ मध्ये नमूद केल्यानुसार, संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी परदेशातील सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे. परदेशात शिकणारे मराठी व अमराठी भारतीय तसेच परदेशी विद्यार्थी यांना राज्य मराठी विकास संस्थेबरोबर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे. जगभरातील समाजमाध्यमांमध्ये मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील अहवाल प्राप्त करून व त्यांचा अभ्यास करून समाजमाध्यमांद्वारे मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासंदर्भात उपक्रमांचे नियोजन करणे.

मराठी भाषा-साहित्य या संदर्भात जगभरातील विविध नियतकालिकांमधून संशोधनपर लेख लिहिण्यासाठी परदेशस्थ शिक्षणसंस्थांमधील मराठी तसेच अमराठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. जगातील विविध देशात वास्तव्य करणाऱ्या तेथील मराठी भाषिक, संस्था यांच्याकडून मराठी भाषेचा प्रचार प्रसार, संवर्धन व विकास यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, क्षणचित्रे, दृकश्राव्य चित्रफिती राज्य मराठी विकास संस्थेकडे पाठविणे अशा जबाबदाऱ्या समन्वयक / उपसमन्वयक पदासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

झंझटच मिटणार! निवृत्तीवेतन धारकांसाठी केंद्र सरकार आणणार ही मोठी सुविधा

Next Post

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता केंद्र उभारणार; अजित पवार यांची घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Next Post
x570 e1655379974473

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता केंद्र उभारणार; अजित पवार यांची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011