गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण संघटनेच्यावतीने जयंत पाटील व अजित पवार यांचा सत्कार

एप्रिल 3, 2023 | 9:30 pm
in राष्ट्रीय
0
FB IMG 1680519511868 e1680535266581

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई इथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा सत्कार केला. दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कार्य करणारे मकरंद कुलकर्णी यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महाराष्ट्रात प्रत्येक समाजात आर्थिक आणि दुर्बल घटक असतात. त्यांना अनंत अडचणींना तोंड देत काम करावे लागते. समाजातील अशा व्यक्तींना उभारी देणे हे समाज सुधारणेचे काम आहे. ही शिकवण आदरणीय शरद पवारसाहेबांनी आम्हाला दिली आहे असे जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

समाजातील वेगवेगळ्या वर्गाने ज्या-ज्या वेळी आरक्षणाची मागणी केली त्यावेळी पवारसाहेब आवर्जून सोबत उभे राहिले. त्याचप्रमाणे ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी मकरंद कुलकर्णी यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना सुविधा मिळाव्यात हा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी केलेला प्रयत्न हा केवळ ब्राम्हण समाजासाठी नसून सर्व समाजासाठींचा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून समाजातील शोषित वर्गाला निधी देण्याचे काम झाले. अजित पवारांनी मंजूर केलेल्या पन्नास कोटींच्या निधीचा फायदा खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना झाला आहे. सत्तेत असताना लोकांकडून सत्कार होत असतात, मात्र महाविकास आघाडी सरकार जाऊन नऊ महिन्यांहून अधिक काळ उलटला असला तरी केलेल्या कामांचे समाधान व्यक्त करण्यासाठी सर्व लोक एकत्र आले, याबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

जनआशीर्वादाने मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे, ही शिकवण आदरणीय शरद पवारसाहेबांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील सर्व घटकांना सोबत नेण्याचा प्रयत्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित काम करताना सारथी, बार्टी, महाज्योती अशा विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

महापुरुषांनी कधीही कोणत्याही जाती-धर्माबद्दल आकसाची भावना ठेवली नाही. हीच शिकवण आपण पुढे नेली पाहिजे. एखादे काम करताना त्यात सातत्य टिकले पाहिजे. जोवर आपण हाती घेतलेल्या कामात यश संपादित करत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तीन पक्ष काम करत होते. हा सत्कार कोणाचा वैयक्तिक नसून सामुदायिक सत्कार आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ठाणे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेचे विजय जमदग्नी, गजानन जोशी, बाळासाहेब पांडे, मनोज गाजरे, प्रदिप अष्टेकर, स्वानंद गोसावी, यशवंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

International Brahman Organization Facilitate Ajit Pawar and Jayant Patil

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील घटना

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – वेटर आणि सुंदर मुलगी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - वेटर आणि सुंदर मुलगी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011