मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दोन देशांची सीमा घरांच्या शयनकक्षातून जाते असे जर तुम्हाला कोणी सांगितले, तर विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. युरोपमधील बार्ले शहर हे अनोखे ठिकाण आहे. या शहरात तुम्ही सकाळी नाश्ता बनवू शकतात, ते दुसऱ्या शहरात जाऊन खाऊ शकतात. आपल्याच घरात एक पाऊल टाकल्यानंतर तुम्ही थेट दुसऱ्या देशात पोहोचू शकतात. बार्ले शहर नेदरलँड आणि बेल्जियमच्या सीमेवर आहे. दोन्ही देशांची सीमा येथील घरांमधून जाते. त्यामुळे येथील नागरिक एक पाऊल नेदरलँड आणि एक पाऊल बेल्जियममध्ये ठेवू शकतात. म्हणजचे बार्ले शहरातील नागरिक क्षणार्धात दुसऱ्या देशात पोहोचू शकतात. कारण देशा-देशांमधील सीमा त्यांच्या घरातून जाते. शहरात अनेक सोशल साइट, रेस्टॉरंट, कॅफे आहेत. त्यातील काही नेदरलँड आणि काही बेल्जियममध्ये आहेत.
बार्ले शहराचा काही भाग नेदरलँडजवळ आणि काही भाग बेल्जियमजवळ आहे. नेदरलँडच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या भागाला बार्ले-नासाऊ असे म्हणतात. बेल्जियमच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या भागाला बार्ले-हर्टोग असे म्हणतात. दोन्ही देशांमधील सीमासुद्धा पांढऱ्या रंगाने आखण्यात आली आहे. येथील अनेक दुकाने, रेस्टॉरंट आणि घरांचे सीमांकन करण्यात आले आहे. ही सीमा काही घरांच्या बेडरूममधून जाते. आश्चर्यचकीत करणारी गोष्टी ही आहे की बार्ले शहराचे दोन नाव आहेत. येथे दोन संस्थान आहेत. दोन महापालिका आणि एक डाकघर आहे. परंतु हे सर्व एकाच संस्थेच्या नियंत्रणाखाली आहे. या वेगळ्या ओळखीमुळे हे शहर नेहमीच चर्चेत असते. जगभरातील अनेक पर्यटक या शहरात येतात आणि फोटोही काढतात.