पंडित दिनेश पंत
प्रत्येकाच्या हात धुण्याच्या सवयी वरून काही प्रमाणात त्याच्या स्वभावाचा अंदाज करता येतो याबाबत गंमत म्हणून निरीक्षण करून आपणही अंदाज घ्या….
१) हाताची फक्त बोटे ओले करून संपूर्ण हात धुतल्याचा आव आणणारे कामापुरता मामा असायची शक्यता असते. कोणत्याही विषयात जास्त चिकित्सा न करता काम साधून घ्यायचा स्वभाव असतो…
१) हाताची फक्त बोटे ओले करून संपूर्ण हात धुतल्याचा आव आणणारे कामापुरता मामा असायची शक्यता असते. कोणत्याही विषयात जास्त चिकित्सा न करता काम साधून घ्यायचा स्वभाव असतो…
२) हाताच्या पंजाचा फक्त पुढचा भाग व्यवस्थित धुणारी व्यक्ती फक्त वर्तमानकाळाचा किंवा हातात असलेल्या कामाचा विचार करणारी असते. ही मंडळी भूतकाळ व भविष्यकाळ यात फारसे रमत नाहीत….
३) प्रत्येक वेळी हाताचा पुढचा व मागचा भाग व्यवस्थित स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीला परिस्थितीचे गांभीर्य पटकन समजते. अशा व्यक्ती चांगले सल्लागार असतात….
४) विशेषतः हाताच्या तळव्यांचा गादी सारखा भाग अधिक वेळ रगडून धुणारी व्यक्ती सहजरित्या कोणावर विश्वास ठेवत नाही. स्वतः खात्री केल्याशिवाय व्यक्त होत नाही. विषय सखोलरित्या समजून घेतात….
५) एकदा हात धुतलेले असताना देखील परत परत हात धुणारी व्यक्ती चंचल स्वभाव, तेच-तेच प्रश्न विचारणारी असते…..
६) हात धुतल्यावर ओल्या हातांनीच कामाला लागणारी व्यक्ती प्रेमळ मोकळ्या मनाची असेल त्या परिस्थितीत मार्ग काढणारी असते…..
७) हात धुतल्यावर संपूर्ण मागून-पुढून बराच वेळ पुसून कोरडा करणारे सुरक्षित गुंतवणूक करतात. कुठेही शब्दात अडकत नाहीत. बराच आधी धोका कळतो. स्वतःचे असे लॉजिक असते…
८) पाणी व लिक्विड सोपची क्वालिटी पाहून हात धुतल्यास विचारपूर्वक मैत्री करतात. त्यांच्या सिलेक्टेड ओळखी असतात. त्यांचा विश्वास संपादन करणे दिव्य असते…
९) हात धुतोय की आंघोळ करतोय इतका वेळ हात धुवत बसणारी व्यक्ती महत्त्वाच्या निर्णयात दुसऱ्यावर अवलंबून असते…
१०) हात धुतल्यावर वारंवार हाताकडे बघणारे खूदपसंद, स्वतःचे मत ठामपणे मांडणारे असतात…
११) हात धुण्याची आठवण दुसऱ्याने करून द्यावी लागणारी व्यक्ती महत्वाच्या ठिकाणी गैरहजर असते…..
वरील बाबींचे आपणही निरीक्षण करा आणि आनंद घ्या.