मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दूध हे पूर्णान्न मानले जाते. नवजात बालकास बालकासाठी आईचे दूध अमृतासमान असते. तर लहान मुलांना बलवर्धक आणि बुद्धिवर्धक म्हणून गाईचे दुध पिण्यासाठी देतात. इतकेच नव्हे तर सर्वच मानव समाजासाठी गाई म्हशीचे दूध हे उपयुक्त मानले जाते. जगामध्ये स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क या सारखे युरोपातील काही देश प्रमुख ते दूध उत्पादक देश म्हणून ओळखले जातात. भारतात देखील मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पन्न होते. परंतु प्रामुख्याने गाई आणि म्हशीचे दूध आपल्याला माहित आहे मात्र काही देशांमध्ये अन्न प्राण्यांचे दूध देखील उपयुक्त असून त्याचे सेवन केले जाते असे दिसून येते.
आपल्या सर्वांना शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकजण दूध पिण्याचा सल्ला देतो. यामुळेच आपण रोज गाईचे किंवा म्हशीचे दूध सेवन करतो. जगभरातील बहुतेक जण गाय किंवा म्हशीचे दूध पितात किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ खातात, परंतु संपूर्ण जगात केवळ गाय किंवा म्हशीचेच दूध सेवन केले जात नाही, तर इतरही काही प्राणी आहेत, ज्यांच्या दूध वापर केला जातो. याशिवाय रान म्हैस, मेंढ्या, उंट, गाढव, घोडी, हरीण, मादी याक इत्यादींचे दूधही जगात विविध ठिकाणी आढळते.
गाय
जगभरात जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी गायीचे पालन केले जाते. गाईचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 2011 मध्ये, FAO ने असा अंदाज लावला की, जगातील 85 टक्के दूध गायीपासून तयार केले जाते. पाश्चात्य देशांमध्ये गाईचे दूध तंत्रज्ञानच्या साह्याने तयार केले जाते. दुग्धोत्पादनात गायीशिवाय म्हशी दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांचे दूध सर्वाधिक वापरले जाते.
गाढव
गायी आणि म्हशींव्यतिरिक्त, शेळीचे दूध पिणे देखील जगभरात सर्वमान्य आहे. एका अहवालानुसार, जगातील सुमारे 2 टक्के नागरिक शेळीचे दूध पितात, तर गाढवाचे दूध जगात सर्वात महाग आहे, 5 ते 10 हजार रुपये प्रति लिटर महाग विकले जाते. गाढवाच्या दुधाचे औषधी उपयोग जास्त आहेत, त्यामुळे ते खूप महाग आहे. भारतातही गाढवाच्या दुधाचा व्यवसाय हळूहळू मोठ्या प्रमाणावर पसरत असून त्याची मागणीही झपाट्याने वाढत आहे.
उंट
सोमालिया आणि केनियासारख्या देशांमध्ये उंट पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. येथील बहुतांश जण उंटाचे दूधच वापरतात. पाणी प्यायल्या शिवाय उंट बरेच दिवस जगू शकतात. सोमालिया आणि केनियासारख्या देशांमध्ये, मेंढपाळ उंटाच्या दुधावरच जगतात जेव्हा ते त्यांच्या उंटांना चरायला दूरवर घेऊन जातात. एक उंट दिवसाला 5 ते 20 लिटर उत्पादन करू शकतो. उंटाच्या दुधाची चव गाईच्या दुधासारखीच असते.
घोडी
मंगोलियातील बहुतेक नागरिक घोडीचे दूध खातात. घोडीच्या दुधाला कुमिस किंवा इराग असेही म्हणतात. मंगोलियामध्ये अतिशय प्रगत घोडे पाळले जातात. हिवाळ्यात घोडीच्या दुधाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. घोडीचे दूध थेट खाल्ले जात नाही, तर स्थानिक लोक ते आंबवून दूध तयार करतात. घोडीचे दूध चवीला किंचित आंबट असते आणि त्याच्या सेवनाने थोडासा नशा येतो.
याक
याक हा हिमालयी प्रदेशातील पाळीव प्राणी आहे, जो लोकर, मांस आणि दूध यासारख्या अनेक सुविधा पुरवतो. गाईच्या दुधापेक्षा याकच्या दुधात चरबी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. काही भागात याकच्या दुधापासून लोणीही तयार केले जाते, ज्याची मागणी आजकाल वाढत आहे. याक हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात जास्त दूध देतात.
हरीण
हरणाचे दूध अत्यंत दुर्मिळ आहे. विशेषतः स्कॅन्डिनेव्हिया देशांमध्ये हरणाच्या दुधाला जास्त मागणी आहे. येथे काही ठिकाणी रेनडिअरचे दूधही वापरले जाते. हरणाच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा 20 टक्के जास्त फॅट असते. ते दूध खूप मलईदार असते.
जिराफ
जिराफ देखील दूध देतो आणि जगाच्या अनेक भागांमध्ये त्याचे सेवन केले जाते. पण जिराफाचे दूध फारसे दर्जाचे नसते असे संशोधनातून समोर आले आहे. असे असूनही अनेक आदिवासी जाती जिराफाचे दूधही खातात.
गरम दूध
गरम दूध पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज एक ग्लास कोमट दूध प्यायल्यास आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. काही कारणास्तव जेवण चुकल्यास, तुम्ही एक ग्लास दूध पिऊन त्याची भरपाई करू शकता. दिवसा नाही तर रात्री दूध पिणे सर्वात फायदेशीर मानले जाते. दुधात ‘ट्रिप्टोफॅन’ हे तत्व आढळून येते, जे झोप वाढवते. कोमट दूध प्यायल्याने झोप तर येतेच पण ते आरोग्यासाठीही चांगले असते.
पोषक मूल्य
दुधात आढळणारे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यासारखे पोषक तत्व शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त, दुधामध्ये मेलाटोनिन हा हार्मोन असतो जो झोप आणि जागृतपणाचे नियमन करण्यास मदत करतो. याशिवाय रात्री दूध प्यायल्याने शरीराला आराम मिळतो, त्यामुळे व्यक्तीला बरे वाटते. जर रात्री भूक लागली असेल तर ते शांत करण्यासाठी दूध हा एक चांगला उपाय आहे.