सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५ हजाराहून अधिक जोडप्यांना मिळणार प्रत्येकी ५० हजार रुपये

by India Darpan
जून 29, 2023 | 5:06 am
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी केंद्र हिस्सा 50% व राज्य हिस्सा 50% या प्रमाणात निधी शासनाकडून दिला जातो. सदर योजनेंतर्गत प्रती दाम्पत्यांना रुपये 50,000/- अर्थसहाय्य देण्यात येते. सदर रक्कम पती-पत्नी यांचे संयुक्त नांवाने देण्यात येते. ही योजना अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन व शिख या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना या योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे जुन 2023 मध्ये रु.27 कोटी 31 लाख 76 हजार इतका निधी शासनाने मंजूर केला आहे. सदरचा निधी क्षेत्रिय कार्यालयांना खर्च करणेसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात मुंबई विभाग- 4 कोटी 39 लाख 68 हजार, ,पुणे विभाग -5 कोटी 33 लाख 50 हजार, नाशिक- विभाग 5 कोटी 79 लाख 50 हजार,अमरावती -विभाग 3 कोटी 86 लाख 50 हजार ,नागपूर विभाग-6 कोटी 52 लाख, औरंगाबाद विभाग -64 लाख 50 हजार ,लातूर विभाग -76 लाख 8 हजार याप्रमाणे निधी वाटप करण्यात आला आहे.
सदर निधीतून 5460 हुन अधिक जोडप्यांना लाभ मिळणार आहे.

समाज कल्याण विभागाने गतिमान यंत्रणा राबवून पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला आहे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना या योजनेंतर्गत निधी अदा करण्याकरिता रु.27 कोटी 31 लाख 76 हजार इतका निधी माहे जुन 2023 मध्ये मंजूर केला आहे. सद्यस्थितीत सदर मंजूर केलेल्या निधीतून प्रती दाम्पत्यांना रुपये 50,000/- प्रमाणे लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांना उपलब्ध देण्यात आला आहे. सदर निधी लवकरच दाम्पत्यांना मिळणार आहे. डॉ. प्रशांत नारनवरे, समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नातून सदरचा निधी तात्काळ मंजूर करून जिल्हा कार्यालयाना उपलब्ध करुन दिला आहे,

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना शासनाने नेहमीच प्रोत्साहन दिले असून त्यांच्या नवीन संसाराला हातभार लागावा, या उद्देशाने अनुदान मंजूर करण्यात येते, राज्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांना निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे लवकरच सदरचा निधी आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांच्या बॅक खात्यात जमा होणार आहे ”
:- डॉ. प्रशांत नारनवरे,आयुक्त ,समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वारी पंढरीची (भाग १५) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी || विठ्ठल ||

Next Post

अखेर नाथाभाऊंनी उलगडले ‘त्या’ घोटाळ्याचे गुपित; फडणवीसांवर केले हे गंभीर आरोप

Next Post
eknath khadse e1697695903104

अखेर नाथाभाऊंनी उलगडले 'त्या' घोटाळ्याचे गुपित; फडणवीसांवर केले हे गंभीर आरोप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011