पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात तरुणांना सरकारी नोकरी हवी असते. त्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करतात, परंतु यश येत नाही, मात्र आता त्यांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. कारण इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने संगणक विज्ञान आणि संप्रेषण तंत्रज्ञान विषयातील 150 सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड-II/तांत्रिक 2022 साठी भर्ती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
अर्जाची प्रक्रिया 16 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 मे आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरतीतून 150 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 56 पदे संगणक विज्ञान आणि संप्रेषण तंत्रज्ञानासाठी आणि 94 पदे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनसाठी आहेत.
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे GATE 2020, 2021 आणि 2022 चे स्कोअर कार्ड असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : दि. 7 मे रोजी उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज शुल्क : सर्वसाधारण, OBC, EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 100 आहे. सर्व SC/ST, महिला उमेदवार आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.