पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घर, शिक्षण, प्रवास, वाहन किंवा अन्य वैयक्तिक कारणांसाठी कर्ज घेणे आवश्यक ठरते. कर्जामुळे आपली तातडीची गरज पूर्ण होते. बँकांकडून तर कर्ज मिळतेच, परंतु विमा पॉलिसीमार्फत देखील आपल्याला कर्ज घेता येते. अनेकांना त्याची माहिती नसते. विमा पॉलिसीवरील कर्ज हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. त्याबाबत आज जाणून घेऊया…
विमा पॉलिसीवरील कर्जासाठी व्याजाचा दर प्रीमियमची रक्कम आणि भरलेल्या प्रीमियमच्या संख्येवर अवलंबून असतो. जीवन विम्यावरील कर्जावरील व्याज १०ते १२ टक्के दरम्यान असते. या आधारे हवे असल्यास तुम्ही कर्जाची रक्कम घेऊ शकता आणि ती व्यवसायात लावून वापरू शकता. विमा केवळ अडचणीतच उपयोगी पडतो असे नाही. अपघात झाला. मृत्यू झाला तर विम्याची रक्कम कुटुंबियांना उपयोगी पडतेच. पण अचानक पैशांची निकड पडली तर, विमा कर्जही मिळवून देऊ शकतो.
वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याची गरज नाही, वा क्रेडिट कार्डची ही गरज नाही. तुमच्या विमा पॉलिसीवरही कर्ज मिळवता येते. हे कर्ज किफायतशीर आणि स्वस्तात मिळते. या कर्जावरील व्याजदर सावकारी पद्धतीचा नसतो. अनेक बँका आणि पतसंस्था दामदुप्पट किंमतीने व्याज आकारतात. विमा पॉलिसीवर कर्ज मिळणे पहिल्या इतके किचकट राहिले नाही.
अत्यंत निकड असेल तर विमा योजना तुमच्या मदतीला धावून येईल. काही सोप्या पद्धतीने या कर्जासाठी अर्ज करु शकता. त्यासाठी तुमची विमा पॉलिसी आणि इतर काही कागदपत्रे आवश्यक आहे. विमा योजनेवर कर्ज मिळवण्यासाठी आता किचकट प्रक्रिया राबविल्या जात नाही. सोप्या आणि किफायतशीर पद्धतीने तुम्हाला विमावर कर्ज मिळवता येतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही दिवसातच रक्कम खात्यात जमा होईल. हा कालावधी कमी अधिक असतो. कर्जाची परतफेड ही विम्याच्या कालावधीवर अवलंबून असते. जर तुम्ही दीर्घकालीन विमा पॉलिसीत गुंतवणूक केली असेल तर त्यानुसार विम्याची परतफेड करता येईल. मुदतपूर्व कालावधीत तुम्हाला कर्जाची रक्कम फेडावी लागेल.
कर्जाचा हप्ता चुकला, थकला तर व्याजाची रक्कम तुमच्या मूळ कर्ज रक्कमेत जोडण्यात येते. त्यानंतर विमा पॉलिसी मॅच्युअर झाली तर ही रक्कम वसूल करण्यात येते. तुमची विमा पॉलिसी बंद करण्यात येते. विमा कंपन्या एकूण विमा पॉलिसीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. विमा पॉलिसीच्या प्रकारानुसार ही टक्केवारी कमी जास्त होते. युलिप, शॉर्ट टर्म आणि इतर विमा पॉलिसीवर धोरणांनुसार कर्ज रक्कम मिळते.
केवळ मुदत विम्यावर कर्ज मिळत नाही, असा कंपन्यांचा नियम आहे. त्यामुळे अशा पॉलिसीधारकांनी नाहक कंपन्यांच्या गळ्यात पडणे टाळावे. इतरांना त्यांच्या विमा पॉलिसीच्या प्रकारानुसार कर्ज रक्कम मिळते. बँकिग अथवा वित्तीय संस्थांपेक्षा सलवतीत कर्ज मिळते. साधारणतः 9 ते 10 टक्के दरानं कर्ज मिळते. खासगी बँका, पतसंस्थांचे कर्जावरील व्याजदर 12 ते 18 टक्क्यांपर्यंत असतो. प्रक्रिया शुल्क, छुपे शुल्क यामुळे हे कर्ज फार महागात पडते. त्यामानाने विम्यावर घेतलेले कर्ज स्वस्त असते. विम्यावरील कर्ज घेण्यासाठी, मूळ विमा पॉलिसी, पॉलिसीची कागदपत्रे आणि रद्द केलेला चेक आवश्यक आहे.
कर्जाची रक्कम परत न केल्यास कर्जाची रक्कम सरेंडर मूल्यातून वसूल केली जाते. तसेच विमा पॉलिसी लॅप्स केली जाते. कर्जाच्या रकमेसह प्रीमियम देखील भरावा लागेल.विम्यावर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज भरावा लागतो. हा अर्ज संबंधित विमा कंपनीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकता. डाऊनलोड झाल्यावर त्याची प्रिंट आऊट काढा. हा अर्ज भरून द्या. या अर्जात तुम्ही घेतलेल्या पॉलिसीचा तपशील द्या. किती कर्ज हवे आहे, त्याची रक्कम टाका. त्यानंतर हा अर्ज तुमच्या नजीकच्या विमा शाखेत जमा करा.
विमा एजंटच्या मदतीनेहीअर्ज भरू शकता. त्याच्या सहायाने अर्ज भरताना चूका टळतील. आता विमा कंपन्यांनी कर्ज देण्यासाठी ऑनलाईन सुविधाही सुरु केली आहे. विमा कंपनीच्या अॅपवर वा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता. काही कागदपत्रे जमा करुन ऑनलाईन कर्जाचा अर्ज जमा करता येईल. ही रक्कम थेट तुम्ही दिलेल्या बँक खात्यात जमा होते. विमा कंपन्या कर्ज देण्याचा अर्ज तयार करतात. हा कर्ज अर्ज भरल्यानंतर तो नजीकच्या शाखेत जमा करावा लागेल. मग योग्य रक्कम खात्यात जमा होईल.
Insurance Policy Loan Process Money Need