इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पतीने पत्नीची हत्या केली किंवा पत्नीने पतीची हत्या केली अशा घटना सतत घडत असतात. परदेशातही हे प्रकार घडतात. इतकेच नव्हे तर एखादी रक्कम मिळविण्यासाठी पती-पत्नी आपल्या जीवन साथीदाराचा जीवही घेऊ शकतात. याची अनेक उदाहरणे सापडतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली. एका महिलेने आपल्या पतीचा खून केला याप्रकरणी अटक करण्यात आली असून शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
नॅन्सी क्रॅम्प्टन ब्रॉफी, (वय 71) हिने अमेरिकेत आपल्या पतीची हत्या कशी करावी याबद्दल ब्लॉग लिहिला, विशेष म्हणजे विम्याचे पैसे मिळविण्यासाठी तिच्या पतीची खुनी बनली. पोर्टलँड, ओरेगॉन येथील न्यायालयाने ब्रॉफीला जोडीदार डॅनियल ब्रॉफीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. नॅन्सीचा अपराध सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षाला न्यायालयात खूप संघर्ष करावा लागला. पतीची हत्या करण्यापूर्वी तिने अनेक महिने कट रचला होता. 12 सदस्यीय ज्युरीने नॅन्सीला सेकंड डिग्री हत्येसाठी दोषी ठरवले. त्यात जन्मठेपेची तरतूद आहे. त्याची शिक्षा 13 जून रोजी जाहीर होणार आहे.
महिलेचा पती 63 वर्षीय शेफ डॅनियल ब्रॉफी यांची 2 जून 2018 रोजी हत्या झाली होती. नैऋत्य पोर्टलँडमधील पाककला संस्थेत शिक्षक तो होता. त्याचा मृतदेह विद्यार्थ्यांना सापडला. त्याच्यावर दोन वेळा गोळ्या झाडल्याचे तपासात समोर आले आहे. न्यायालयात, फिर्यादीने सांगितले की, नॅन्सी पैशांच्या कमतरतेमुळे त्रस्त होती. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट रचला. फिर्यादीनुसार, नॅन्सीने आपल्या पतीची हत्या करण्यापूर्वी अनेक महिने बंदुकीचे अनेक भाग गोळा केले. तिने एक सुटे भाग ऑनलाइन विकत घेतला होता जो बंदुकीचा गोळीबार झाला तेव्हा पोलिसांना शोधता आला नाही. कॅमेरे आणि साक्षीदार नसल्यामुळे तिने डॅनियलला मारण्यासाठी त्यांचे कामाचे ठिकाण निवडले.