नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दि. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएमएआय) चे कोलकत्ता येथील मुख्यालयातून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार फाऊंडेशन/इंटरमीजिएट व फायनल कोर्सच्या डिसेंबर २०२३ परीक्षेच्या प्रवेश नोंदणीसाठी १० ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती सीएमए इन्स्टिट्यूट नाशिक चॅप्टरचे चेअरमन सीएमए आरिफखान मन्सूरीयांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
सध्या देशात अनेक भागात पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहेत तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील काही वर्गांचे पेपर उशीरा झालेत त्यामुळे त्यांचे निकाल हि उशीरा लागल्याने विद्यार्थाना ३१ जुलै ह्या शेवटच्या तारखेच्या आत सीएमएकोर्सला प्रवेश नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या याकरिता इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुदत वाढ दिल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसून त्यांना मोठी संधी मिळाली आहे यांचा जास्तीती जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. जे विद्यार्थीडिसेंबर २०२३ परीक्षेस बसू इच्छिता त्यांनी फाऊंडेशन/इंटरमीजिएट/फायनल कोर्सला १० ऑगस्ट पर्यंत प्रवेश नोंदणी करावी असे आवाहन सीएमए इन्स्टिट्यूट नाशिक चॅप्टरचे चेअरमन आरिफखान मन्सूरी यांनी केले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग क्लास
सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थंना व्यावसायिक शिक्षण घेत असताना कोचिंग क्लासला करीत येणारा मोठा खर्च उचलणे शक्य नसते परंतु सीएमए इन्स्टिट्यूट नाशिक चॅप्टरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठीमोफत कोचिंग क्लासची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने विद्यार्थी व मुख्यत: पालकांवरचा आर्थिक ताण कमी होणार आहे याचा देखील फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सीएमए इन्स्टिट्यूट नाशिक चॅप्टर प्रसन्न अर्कीट,२ रा मजला, माझदा हॉटेल शेजारी, त्र्यंबक नाका सिंग्नल, नाशिक. फोन नं. (०२५३) २५००१५०/२५०९९८९ मो. ९४२३७३४९०० येथे संपर्क करू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.
institute cost account india cma admission education course