इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या अनेक इंस्टाग्राम वापरकर्त्यांना समस्या येत आहेत. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांची खाती परस्पर निलंबित केली जात आहेत. इंस्टाग्रामने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी अनेक तास व्हॉट्सअॅप डाउन होते, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता अशीच समस्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग अॅपवर समोर आली आहे. युजर्स दावा करत आहेत की, लॉग इन केल्यावर खाते निलंबनाची सूचना येते. सोशल मीडियावर बरेच लोक स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. तर इंस्टाग्राम खरोखर लोकांची खाती निलंबित करत आहे का?
इन्स्टाग्रामच्या कम्युनिकेशन टीमने ट्विट केले आहे की, “आम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ऍक्सेस करण्यात समस्या येत आहे. आम्ही त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्रास दिल्याबद्दल क्षमस्व. एका यूजरने लिहिले, इन्स्टाग्राम, काय चालले आहे? माझे खाते कोणतेही कारण नसताना निलंबित करण्यात आले. जेव्हा मी कोड सत्यापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्रुटी दिसून येते. इतर कोणाला हीच समस्या आहे का?
तज्ज्ञांच्या मते, हे सहसा सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यास घडते. ट्विटरवरही अशीच समस्या होती. हॅकरने बॅकएंडमध्ये प्रवेश घेतल्याचे नंतर उघड झाले. मात्र, आतापर्यंत कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मने हॅकिंगबाबत माहिती दिलेली नाही.
@instagram what is going on? My account literally got suspended for no reason I did not violate any community guidelines, and when I try to verify the code it's just giving me a loading error. Is anybody else having this problem? #instagramdown #Instagram pic.twitter.com/ZSRjIaHNwH
— Pradeep Chaudhary (@impradeep90) October 31, 2022
Instagram Users Account Suspend Issue
Social Media Technology