शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अश्लिल व्हिडिओ व्हायरलनंतर इन्स्टा स्टार सोनाली गुरव म्हणाली…

एप्रिल 6, 2023 | 5:21 am
in मनोरंजन
0
Capture 4

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडीया तथा आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक कामे अगदी सहज होत असली तरी, या तंत्रज्ञानाच्या विकृत पध्दतीने वापर केल्यास एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकते, याची अनेक उदाहरणे समाज घडताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर स्टार , इन्फ्लुएन्सर असेलली तरुणी सोनाली गुरव हिच्यासोबत असाच घडला धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना आता होणार शिक्षा होणार आहे.

सोनाली गुरव ही इन्स्टाग्रामवर नेहमीच खूप सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचलेली रिल स्टार म्हणून सोनाली गुरवला ओळखले जाते. मात्र तिने या घडलेल्या वाईट प्रकाराबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही जणांना याचा स्पष्ट जाबही विचारला आहे. तसेच तिने पोलिसात जाण्याचे धाडस दाखवल्याबद्दलही भाष्य केले आहे. तसेच तिने केलेल्या तक्रारीचा फोटोही तिने यात शेअर केला आहे. काही विकृत इसमांनी सोनालीचा चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याच्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली आहे.

तिने म्हटले की, ‘आपला चेहरा मॉर्फ करून सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याची माहिती कळाली. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. पटकन सगळे सोडून कुठेतरी निघून जावसे वाटले, खूप वाईट वाईट विचार येऊ लागले. ही घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या. सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटले जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या होत्या, असे तिने नमूद केले आहे.

याप्रकरणी सोनालीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोनाली गुरवने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या पोस्टनंतर तिला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल तिने आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/CqikyI7IOTQ/?utm_source=ig_web_copy_link

पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ विडीओ सध्या वायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली. पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. हि घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या. सगळं काही छान सुरु असताना एखाद वादळ येऊन सगळं उध्वस्त करून जातं. अगदी तसच वाटलं. आणि सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या.

लोकांना चर्चेला, मजा मारायला नवीन विषय मिळाला. खरंच एवढा वेळ आहे लोकांकडे? हि वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच react करणार आहोत का? याची जाणीव कशी नाही होत. काही दिवस घाबरत कसेबसे दिवस ढकलू लागले पण नंतर घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं. आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटत. पण त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या. पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्याना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

फक्त खंत हीच आहे. कि आपला समाज एवढा विकृत कसा काय झाला? कुठून येते हि विकृती. १६-१७ वयाची लहान लहान पोरं देखील अश्लील केमेंट मेसेज करतात तेव्हा चीड येते. स्वतःच्याच समाजात वावरण्याची भीती वाटते. पण आता ठरवलं आहे मी जशी हि घटना झाल्यानंतरही माझ्या चाहत्यांचं, हितचिंतकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही त्यापेक्षा दुपटीने मेहनत करून तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करत राहीन. लवकरच अश्लीलता नसलेल्या, जज न करणाऱ्या समाजात मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली बागडतील हीच स्वामींचरणी प्रार्थना.

Insta Star Sonalee Gurav Post After Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अश्लील रिल्स बनवणे.. ब्लॅकमेल करणे… आलिशान कारमधून फिरणे… अखेर सजनीत कौरला अटक… असे आहेत तिचे कारनामे

Next Post

अहमदनगर शहर व जिल्ह्यात राबविली जाणार ही बेधडक मोहिम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
IMG 20230405 WA0032

अहमदनगर शहर व जिल्ह्यात राबविली जाणार ही बेधडक मोहिम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011